पीएमआरडीएने अनधिकृत बांधकामे करणारांच्यावर पोलिसात नोंदवले गुन्हे : नोटीसचे अनुपालन न करणे भोवले

Date:

पुणे / पिंपरी (दि.३) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) मौ. हिंजवडी आण‍ि मांजरी भागातील अनधिकृत बांधकाम धारकावर गुन्हे नोंदव‍िण्यात आले आहे. तत्पुर्वी संबंध‍ितांना अनधिकृत बांधकाम थांबव‍िण्याबाबत नोटीस बजावली होती. पण त्या नोटीसचे अनुपालन न केल्याने शेवटी दोघांवर पीएमआरडीएकडून गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.

मंगळवारी (दि.1) हिंजवडी ता. मुळशी येथील स.नं.258/1/3/ह.पै. सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम करणारे श्रीकांत भानुदास नवले (रा. हिंजवडी ता. मुळशी) यांचे विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशन तर मांजरी ता. हवेली येथील सर्व्हे नं.153 पै. मधील अनधिकृत बांधकाम करणारे दिपाली विजय भाडाळे (रा.हडपसर,पुणे) यांचेविरूध्द हडपसर ठाण्यात गुन्हा दाखल केला. संबंध‍ित बांधकामधारकांना पीएमआरडीएकडून वेळोवेळी अनधिकृत बांधकाम थांबविणेसाठी नोटीसद्वारे कळवले होते. पण बांधकामधारक यांनी प्राधिकरणाच्या नोटीसचे अनुपालन न केल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 कलम 54(2) अन्वये हिंजवडी आण‍ि हडपसर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील मालमत्ताधरकांनी परवानगी घेवूनच आपली बांधकामे करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. यासह सुरु असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत. अन्यथा संबंध‍ितांवर उक्त नियमाप्रमाणे कारवाई करणार असल्याचे पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी स्पष्ट केले. सदरचे गुन्हे दाखल करण्याची कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन मस्के, रविंद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता गणेश जाधव, विष्णुदास आवाड यांनी केली.

पहिल्यांदाच नोंदवला या कलमान्वये गुन्हा
सदर तरतुदीच्या अनुषंगाने हिंजवडी व मांजरी येथील अनधिकृत बांधकामधारक अनुक्रमे श्रीकांत नवले आण‍ि दिपाली भाडाळे यांचेवर पहिल्यांदाच या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 नुसार अनधिकृत बांधकाम धारकास अनधिकृत बांधकाम थांबविणेची नोटीस दिल्यानंतर सदर बांधकाम न थांबविलेस तीन वर्षापर्यंतची शिक्षा किंवा पाच हजार रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी

वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी...

अजितदादा यांच्या निधनामुळे महापौर निवडीनंतर भाजपकडून कोणताही जल्लोष होणार नाही – गणेश बिडकर

महापौर निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव! पुणे: पुणे महानगरपालिकेतील...

महाशिवरात्री निमित्त सोमेश्वरवाडी येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन : नगरसेवक सनी निम्हण

पुणे : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर...