प्रत्येकाने आंतरिक मनापासून ध्यान करायला शिकले पाहिजे – सरश्री
ध्यानाच्या अंतरंगात डुबकी मारून आनंद घेता येतो – सरश्री
पुणे-सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकजण तांत्रिक साधनात स्वतःचा शोध मोबाईल, इंटरनेट, संगणक येथे घेत बसला आहे. याच तांत्रिक साधनात तो अडकल्याने प्रत्येकजण स्वतःला विसरून गेला आहे. स्वतःचा शोध हा स्वतःमध्ये सापडणार आहे. त्यासाठी ध्यान करने अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रख्यात वक्ते आणि लेखक सरश्री यांनी तेजज्ञान फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या ध्यान के गुलिस्तान से सफल इन्सान कैसे बने ‘या कार्यक्रमात केले. हा कार्यक्रम सिंहगड रोड येथील मनन आश्रम येथे पार पडला.
सरश्रींनी ध्यानाचे महत्व अधोरेखित करताना पुढे म्हणाले की, महान शास्त्रज्ञ थॉमस एडिसनने एकाग्रतेने कार्य केल्याने त्यांना विजेचा शोध लावता आला. त्याप्रमाणे प्रत्येकाने आंतरिक मनापासून ध्यान करायला शिकले पाहिजे. ध्यानाच्या अंतरंगात डुबकी मारून आनंद घेता येतो तो आनंद स्थायी स्वरुपात असतो. सर्वसामान्यपणे माणूस डाव्या मेंदूचा अधिक उपयोग करतो परंतु ध्यानामुळे डाव्या आणि उजव्या मेंदूचा समतोल साधून रचनात्मक कार्य करता येते. आणि यामुळे आपल्या कार्यात सुंदरता आणि गुणवत्ता येते.
प्रत्येक व्यक्तीची त्याच्या कामावरून काम करणाऱ्यााची ओळख होते. त्यामुळे गुणवत्तापूर्ण काम महत्वाचे आहे. ध्यानामुळे माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. त्यामुळे तो व्यक्तिगत लोककल्याणाचे कार्य करू शकतो. ती आज काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने आजकालच्या धकाधकीच्या जीवनात रोज ध्यान करने अत्यंत गरजेचे आहे. सदरील कार्यक्रमात ऑनलाईन व ऑफलाईन प्रणालीद्वारे जवळपास दहा हजार पेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते.

