मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी
पुणे : मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दि. 8 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. डेक्कन अभिमत महाविद्यालयाचे माजी कुलसचिव गो. बं. देगलुरकर यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. खंडेराव कुलकर्णी (शिक्षकरत्न पुरस्कार), रमेश अंबरखाने (उद्योग रत्न पुरस्कार), प्रदीप नणंदकर, (आदर्श पत्रकारिता पुरस्कार), रमाकांत जोशी (आरोग्यरत्न पुरस्कार), धनंजय गुडसुरकर (साहित्यरत्न पुरस्कार), सुधाकर जाधवर (शिक्षणरत्न पुरस्कार), मंगेश बोरगावकर (संगीतरत्न पुरस्कार), दिनेश वैद्य (औद्योगिक सुरक्षा पुरस्कार), गौतम बनसोडे (उद्योगरत्न पुरस्कार), संदीप पंचवाटकर (कलारत्न पुरस्कार), परमेश्वर पाटील (उद्योगरत्न पुरस्कार) यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती मराठवाडा सेवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिनकर चौधरी, उपाध्यक्ष दिनेश सास्तुरकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पुरस्काराचे वितरण केंद्रीय विमुक्त भटक्या व अर्ध भटक्या जमाती विकास मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री भिकुजी (दादा) इदाते यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेक्कन अभिमत महाविद्यालयाचे माजी कुलसचिव गो. बं. देगलुरकर असणार आहेत. मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.