पुणे, दि ३ ऑक्टोबरः जिल्हा परिषद, मुळशी तालुका शालेय क्रीडा योगासन स्पर्धेत १४ ते १७ वर्षाखालील वयोगटातील मुला- मुलींनी सादर केलेली योगासनांची एका पेक्षा एक प्रात्यक्षिके पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी निर्विवादपणे आपले वर्चस्व गाजवत ९ पदके मिळविले. यामध्ये ६ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कास्य पदकांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद, मुळशी तालुका शालेय क्रीडा योगासन स्पर्धा इनडोअर स्टेडीयममध्ये रंगली. या मध्ये जिल्ह्यातील योगापटूंनी सहभाग नोंदविला होता. तसेच १४ वर्षा वयोगटातील खेळाडूंची संख्या मोठी होती. यामध्ये विविध प्रकारच्या अवघड व अति अवघड आसनांचे सादरीकरण करण्यात आले.तसेच हि स्पर्धा पारंपारिक योगासने , रिदमिक व अर्टिस्टिक या तीन प्रकारत पार पडली.
१४ वर्षाखालील मुलांमध्ये मेधांश बहादुर यांनी रिदमिक योगासन प्रकारात सुवर्ण पदक तर मुलींमध्ये अद्विका जाधव ला २ सुवर्ण पदक मिळाले. तसेच ऐशानी बाहेतीला रौप्य तर रेवा भिसे ला कांस्य पदक मिळाले आहेत.
१७ वर्षाखालील मुलींमध्ये महिका पटवर्धनला सुवर्णपदक आणि १९ वर्षाखालील मुलीं मधील स्पर्धेत सई कुलकर्णी हिला १ सुवर्णपदक तर १ कांस्यपदक मिळाले तसेच सानवी अमेसुर हिला १ सुवर्णपदक मिळाले आहे.
या खेळाडूंच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी शुभेच्छा दिल्यात.
ध्रुव ग्लोबल स्कूलचे प्रशिक्षक वैष्णवी आद्रे, प्रगती देशमुख आणि वैष्णव कोरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
योगासन स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल ला ९ पदकेअद्विका जाधव २, मेधांश, महिका, सई व सानवीला १-१ सुवर्णपदक
Date:

