Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

स्वराज ट्रॅक्टर्सतर्फे २५ एचपी विभागात टार्गेट ६२५ लाँच करत टार्गेट श्रेणीचा विस्तार

Date:

२५ एचपी विभागाची समीकरणे नव्याने प्रस्थापित करण्यासाठी वैविध्य आणि सोस्करपणाचा समावेश

मोहाली३ ऑक्टोबर २०२४ – स्वराज ट्रॅक्टर्स या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या ट्रॅक्टर ब्रँडने टार्गेट ६२५ लाँच करत आपल्या लोकप्रिय ‘स्वराज टार्गेट श्रेणीचा’ विस्तार केला आहे. ४डब्यूडी आणि २डब्ल्यूडी व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असलेला स्वराज टार्गेट ६२५ आटोपशीर, हलक्या वजनाच्या ट्रॅक्टर श्रेणीची समीकरणे आपली अमर्याद ताकद, तंत्रज्ञान व वैविध्यतेसह बदलण्यासाठी सज्ज आहे.

स्वराज टार्गेट श्रेणी आटोपशीर व हलक्या वजनाच्या ट्रॅक्टर विभागात नवे मापदंड प्रस्थापित करण्यासाठी ओळखली जात असून, स्वराज टार्गेट ६२५ च्या लाँचने, विशेषतः २ डब्ल्यूडी व्हेरिएंट लाँच करत, कंपनीने शेतीच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यासाठी उत्सुक असलेल्या आधुनिक शेतकऱ्यांसाठी नव्या संधी खुल्या केल्या आहेत. दमदार कामगिरी व ऑपरेटरला मिळणारा आरामदायीपणा यामुळे शेतीच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रगत शेतकऱ्यांसाठी नव्या संधी खुल्या केल्या आहेत.

स्वराज टार्गेट ६२५ देशांतर्गत ट्रॅक्टर क्षेत्रातील प्रवर्तकीय उत्पादन असून, ते प्रगतिशील शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याच्या हेतून डिझाइन करण्यात आले आहे. ताकद, तंत्रज्ञान आणि वाट काढण्याची क्षमता यांचा असामान्य मेळ घालण्यात आलेले हे ट्रॅक्टर्स शेतीच्या विविध कामांसाठी उत्तम असून, त्यात स्प्रेईंग आणि इंटरकल्चर कामकाजाचा समावेश आहे. याचे आटोपशीर डिझाइन आणि सर्वोत्तम वैशिष्ट्ये आधुनिक यंत्रणा, सुधारित उत्पादनक्षमता व पिकांचे कमीतकमी नुकसान हवे असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आदर्श आहे.

या विभागातील सर्वात अरुंद ट्रॅक रुंदी व कमी टर्निंग रेडियससह स्वराज टार्गेट शेतकऱ्यांना लहान जागेत सहजपणे वाट काढता येईल, उत्पादनक्षमता वाढविता येईल, याची खात्री करतो. याचे इंधनक्षम डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त वैशिष्ट्ये उदा. सफाईदार गीयरशिफ्टसाठी सिंक्रेश गीयरबॉक्स, कारप्रमाणे आरामदायीपणा व नियंत्रण शेतीचा एकंदर अनुभव उंचावतात.

प्रमुख वैशिष्ट्ये आणि टार्गेट ६२५ चे लाभ

जबरदस्त ताकद व कामगिरी

·         दमदार डीआय इंजिन – आकर्षक ८१.३ टॉर्कमुळे हा ट्रॅक्टर ६०० लीटर्सपर्यंतचे ट्रेल्ड स्प्रेयर्स चिखलयुक्त भागातही सहजपणे हाताळता येतो.

·         ॲडजस्ट करता येण्यासारखी फ्लेक्सी ट्रॅकची रुंदी – या विभागात सर्वात अरुंद जागा देणारा ट्रॅक्टर असून, त्यात २८, ३२ किंवा ३६ इंचीचे ॲडजस्ट करता येण्यासारखे पर्याय देण्यात आले आहेत, जे वेगवेगळ्या पिकांसाठी योग्य ठरतात.

·         सर्वोच्च लिफ्ट क्षमता – याची लिफ्टिंगची क्षमता ९८० किलो असून, त्यामुळे अवजड उत्पादनेही सहजपणे उचलता येतात.

·         एडीडीसी हायड्रॉलिक्स – डक फूट कल्टिव्हेटर्स, एमबी नांर या व अशा ड्राफ्ट उपकरणांसह अचूक खोली मिळते.

·         या विभागातील सर्वाधिक पीटीओ ताकद – यात १४.०९ केडब्ल्यू (१८.९ एचपी) पीटीओ ताकद देण्यात आली असून, त्यामुळे एकसारखे आणि टेल्ड स्प्रेइंग असतानाही धुक्याप्रमाणे स्प्रेइंग मिळते.

आधुनिक तंत्रज्ञान

·         मॅक्स- कूल रेडिएटर – अधिक चांगल्या प्रमाणात उष्णतेचे विभाजन होण्यासाठी आणि दीर्घकाळ वापरानंतर ओव्हरहीटिंग होऊ नये, यासाठी २० टक्क्यांनी मोठे डिझाइन देण्यात आले आहे.

·         सातत्यपूर्ण मेश ट्रान्समिशन – सफाईदार गीयर शिफ्टिंगची खात्री

·         इंजिन की स्टॉप – किल्लीने इंजिन चालू/बंद करण्याची सोय

·         समतोल पॉवर स्टिअरिंग – पिकांच्या रांगांमध्ये वाट काढताना कमी थकवा येतो व ऑपरेटरचा आरामदायीपणा वाढतो

·         स्टायलिश डिजिटल क्लस्टर – कमी प्रकाश असतानाही दृश्यमानता आणि वापरातील सोपेपणा वाढतो

·         दुहेरी पीटीओ – ५४० आणि ५४० ई इकॉनॉमी पीटीओ मोड्सचा समावेश, अल्टरनेटर्स आणि वॉटर पंप्ससारखी हलकी उपकरणे वापरल्यास इंधन बचत शक्य होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...

विधानसभेत 75 हजार 286 कोटी रुपयांची पुरवणी मागणी, ७ विधेयके सादर

नागपूर - विधानसभेत 75 हजार 286 कोटी रुपयांची पुरवणी...