पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री पदी विराजमान करण्याचा संकल्प
मुंबई
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील संघटनात्मक बांधणीसाठी लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भाजपा महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांचा दोन दिवसीय दौरा यशस्वीरीत्या संपन्न झाला. त्यामध्ये संघटनात्मक आणि सार्वजनिक स्वरूपाचे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा निर्धार या दौऱ्यात करण्यात आला. भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष वानती श्रीनिवासन यांच्या मार्गदर्शनात उत्तर पश्चिम मुंबईत श्रीमती माया नारोलिया (प्रदेश अध्यक्ष) तर उत्तर पश्चिममध्ये श्रीमती सुमित्रा लालू (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य), उत्तर मध्य मुंबईत श्रीमती ममता रानी (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य), उत्तर पूर्व मुंबईत श्रीमती अंजू वारियर (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य), दक्षिण मध्य मुंबईत श्रीमती शांतला भट्ट (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य) तर दक्षिण मुंबईत श्रीमती आशा नौटियाल (प्रदेश अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये धार्मिक स्थळांना भेट अंतर्गत सिद्धिविनायक मंदिर दर्शन त्याचबरोबर चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर स्मारक बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ येथे भेट देऊन अभिवादन करण्यात आले. कॉलेजमधील नव तरुण मतदारांसोबत संवाद साधण्यात आला. आशा सेविका आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. महिला लाभार्थ्यांचा एक करोड सेल्फी कार्यक्रम घेण्यात आला. सरकारी रुग्णालय, शाळा, कॉलेज भेट, जिल्हा पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी तसेच वरिष्ठ कार्यकर्त्यासोबत बैठक झाली. यावेळी कमल मित्र अभियान राबवण्यात आले. संघटनात्मक बळकटीचे काम मोठ्या प्रमाणावर करण्याचे आवाहन भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले. प्रवास दौरा यशस्वी होण्याकरिता मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष शितल गंभीर – देसाई यांच्यासहित मुंबई भाजपा महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला

