पुणे-भारती विद्यापीठ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,”पुणे पोलीस आयुक्तालयातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे सागर संदिप शर्मा ऊर्फ भोवते, वय २० वर्षे, रा. एस. आर. ए. बिल्डींग, ए-विंग, लेक टाऊन जवळ, भारती विदयापीठ, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह जबरी चोरी, पळवुन नेणे, बेकायदाशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री. विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे व श्री. चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदरची कामगिरी पार पाडली.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मा. पोलीस आयुक्त यांनी चालु वर्षामध्ये दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या ६९ कारवाया केल्या आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
लेक टाऊनजवळील सराईत गुन्हेगार सागर शर्मावर एम.पी.डी.ए.ची पोलीस कारवाई
Date:

