१५१८ विद्यार्थिनींनी तब्बल १० हजार ७५० कोरफड रोपांची केली लागवड : इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Date:

पुणे : कात्रज येथील सरहद महाविद्यालयामधील १५१८ विद्यार्थिनींनी एकाच दिवशी तब्बल १० हजार ७५० कोरफड रोपांची लागवड करून विक्रम केला आहे. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे.

सरहद महाविद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त १५१८ विद्यार्थिनींनी १० हजार ७५० पेक्षा जास्त कोरफड रोपांची लागवड केली. यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, सचिव सुषमा नहार, सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, माजी प्राचार्य डॉ. हनुमंतराव जाधवर, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.संगीता शिंदे, परीक्षक चित्रा जैन, सरहद संस्थेच्या विविध विभागांचे प्रमुख, सरहद महाविद्यालयाच्या विविध विभागांचे प्रमुख, उपक्रम समन्वयक वनस्पतीशास्त्र विभागाच्या डॉ. वर्षा निंबाळकर, सर्व प्राध्यापक, विद्यार्थिनी, स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

शैलेश वाडेकर म्हणाले, शाश्वत विकास साधायचा असेल तर पर्यावरण पूरक जीवन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे हा विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजावा यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि केवळ बोलण्यापेक्षा आणि शिकण्यापेक्षा त्यांच्या हातून कृती घडावी या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अनुज नहार म्हणाले, कारगिल मधील सुरू व्हॅली येथे निसर्गोपचारावर आधारित उपक्रम सरहद संस्थेच्या वतीने सुरू आहेत. त्या उपक्रमांना सहाय्य करण्याच्या दृष्टीने आणि कोरफड वनस्पतीचे फायदे समजावेत, निसर्गोपचारांबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी कोरफड लागवडीचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.

डॉ. संगीता शिंदे म्हणाल्या, पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पर्यावरण पूरक अशा कुंडीमध्ये कोरफडीचे रोप लावण्यात आले असून विद्यार्थिनी हे रोप घेऊन आपल्या आजूबाजूच्या परिसरात, घरी सोसायटीमध्ये लावणार आहेत. डॉ. स्वाती माने व कोमल शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्रीराज भोर यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आरटीई कायद्यात सुधारणा करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी

पुणे  : राईट टू एज्युकेशन ॲक्ट, 2009 मध्ये आवश्यक...

रामनवमी निमित्ताने धायरी परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन

भाविक व नागरिकांचा उदंड प्रतिसाद पुणे:   रामनवमीनिमित्त धायरी परिसरात भगवान...

थायलंडच्या फुकेतमध्ये मराठी संस्कृतीची छाप; पर्यटनासोबत रिअल इस्टेट गुंतवणुकीची नवी दिशा!

फुकेतमधील ‘दगडूशेट गणपती’ मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र! मुंबई, (प्रतिनिधी)...