Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली- अरविंद शिंदे

Date:

पुणे- गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरीक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गावगुंड आमदार संजय गायकवाडने राहुल गांधीची जीभ कापणाऱ्यास बक्षीस जाहीर केले भाजपाचा खा. अनिल बोंडेने त्यांच्या जीभेला चटके देण्याचे वक्तव्य केले आहे. या गंभीर धमक्या असून सरकारने यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.

      यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘जननायक राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे हताश आणि निराश झालेले सत्ताधारी. राहुलजींच्या वक्तव्याची मोडतोड करून विपर्यास करून त्यांच्या बदनामीची मोहिम चालवत आहेत. राहुल गांधी कधीही आरक्षण बंद करू असे म्हटले नाहीत. उलट आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून ज्या समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवू असे म्हटले आहेत. पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांची पिलावळ साततत्याने अफवा पसरवून फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे गुंड प्रवृत्तीचे लोक तर त्यापुढे जाऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. सरकार या गुंडावर काहीच कारवाई करत नाही, त्यामुळे देशात कायद्याचे राज्य आहे की भाजपाच्या गुंडांचे असा प्रश्न जनतेला पडला आहे?

      भाजपाचे केंद्रिय मंत्री रवनित बिट्टू यांनी राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटले आहे. शिंदेच्या शिवसेनेचे गावगुंड आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ कापणाऱ्यास ११ लाखाचे बक्षीस जाहिर केले आहे. तर भाजपाच्या राज्यसभा खासदार अनिल बोंडे याने राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत असे वक्तव्‍य केले आहे. भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या नेत्यांची ही वक्तव्‍ये अत्यंत गंभीर असून राहुलजींच्या जिवीताला यांच्यापासून धोका आहे हे झाले आहे. त्यामुळे हे सर्व जाणिवपूर्वक सुरू आहे हे स्पष्ट झाले आहे. राहुलजी गांधी सातत्याने संसदेत आणि देशभरात सामाजिक न्यायाचा आवाज बुलंद करत आहे. जातीनिहाय जनगणना करण्याची व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून दलित, आदिवासी, ओबीसींची हिस्सेदारी वाढवण्याची मागणी केली आहे. या गोष्टींना ज्याचा विरोध आहे ते लोक सातत्याने राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्‍ये करण्याची, जीवे मारण्याच्या धमक्या देण्याची सुनियोजित मोहिम चालवत आहे.  

     संजय गायकवाड सारख्या अडाणी लोकांना राहुल गांधी अमेरिकेत काय बोलले ते माहित तरी आहे का? राहुल गांधी मोदी, शाह यांना घाबरत नाहीत. संजय गायकवाड सारख्या गावगुंडांच्या धमक्यांना ते थोडेच घाबरणार आहेत. आमच्यासारखे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते ढाल बनून त्यांचे संरक्षण करायला सज्ज आहेत. त्यांच्या केसाला धक्का लावायचा प्रयत्न सोडा विचारही करू नका.’’ यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस ॲड. अभयजी छाजेड, माजी महापौर सौ. कमलताई व्यवहारे,नगरसेवक अविनाश बागवे,युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष सौ. संगीताताई तिवारी,अजित दरेकर, रफिक शेख, सुजाता शेट्टी,मुख्तार शेख, वैशाली मराठे, , अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख, उस्मान तांबोळी, भीमराव पाटोळे, नितीन परतानी, राजेंद्र भुतडा, विनोद रणपिसे, ब्लॉक अध्यक्ष अजित जाधव, सुजित यादव, रविंद्र माझीरे, राजू ठोंबरे, रमेश सोनकांबळे, हेमंत राजभोज, विशाल जाधव, आसिफ शेख, रमेश सकट, प्रदिप परदेशी, संदिप मोकाटे, रवि आरडे, श्याम काळे, विल्सन चंदवेल, भरत सुराणा, नुर शेख, वाहिद निलगर, राज अंबिके, हर्षद हांडे, भगवान कडू, कृष्णा सोनकांबळे, विश्वास दिघे, संगीता पवार, छाया जाधव, शोभना पण्णीकर, ज्योती परदेशी, सोनिया ओव्‍हाळ, वैशाली रेड्डी, सुंदरा ओव्‍हाळ, पपिता सोनावणे इत्यादी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विमान वाहतूक कोसळली: काय म्हणाले मंत्री मोहोळ

इंडिगोने पायलटच्या कामाची वेळ पाळली नाही: ४ सदस्यीय चौकशी...

अजित पवारांबरोबर नाहीच , महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, खुद्द शरद पवारांची मान्यता – प्रशांत जगताप

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस...