Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची किमया २७४८ घरांचे मासिक वीजबिल झाले शून्यवत

Date:

पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२४: घरगुती वीजग्राहकांना मासिक ३६० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये पुणे परिमंडलात १३.७३ मेगावॅट क्षमतेचे २ हजार ७४८ छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून संबंधित घरगुती वीजग्राहकांचे मासिक वीजबिल देखील शून्यवत झाले आहे. तर आणखी ४६० छतावरील सौर प्रकल्पांचे काम वेगाने सुरु आहे.

घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. या योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर करण्याची सूचना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्यासोबतच सौर नेटमीटर देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

घरगुती व गृहसंकुलांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या आणि सुमारे २५ वर्ष मोफत वीज देणाऱ्या सूर्यघर योजनेत पुणे परिमंडल अंतर्गत आतापर्यंत घरगुती वीजग्राहकांचे १३ हजार ६७७ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे शहरात १३९१, पिंपरी चिंचवड शहरात ७७१ आणि मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांत ५८६ सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. घरगुती ग्राहकांनी या योजनेत अधिकाधिक संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे.

या योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात घेत आहे व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

मंगळवारी रास्तापेठमध्ये प्रदर्शनी व प्रशिक्षण – महावितरण, ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ व ‘मास्मा’च्या संयुक्त सहकार्याने रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या आवारात मंगळवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची नागरिकांना माहिती देण्यासाठी प्रदर्शनी लावण्यात येणार आहे. योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध असलेल्या या प्रदर्शनीला नागरिकांना भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच महावितरणचे ३६० अभियंते व ५० एजन्सीचे प्रतिनिधी यांना सौर प्रकल्पांबाबत एक दिवसीय ९ सत्रांत विविध तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या -देवेन्द्रजी तुम्ही करत काय आहात ?

पुणे-महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या प्रचंड...

11 सरकारी रुग्णालयातून ‘बोगस’ औषधींचे वितरण:मंत्र्यांची कबुली

नागपूर:राज्यातील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये बोगस औषधांचा पुरवठा आणि वापर...

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...