नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या सांगता समारंभानंतर मोठा राडा पाहायला मिळाला. रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या स्वीकारण्यासाठी राज्य सरकारचे जबाबदार व्यक्ती हजर नसल्याने, रोहित पवार आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जर कोणी जबाबदार व्यक्ती निवेदन स्वीकारण्यास येणार नसेल तर आम्ही विधानभवनात जाऊन निवेदन देऊ, असं रोहित पवार म्हणाले होते. तेव्हाच रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवली त्यावेळी पोलिस व युवकांध्ये वाद सुरू झाला.आणि रोहित पवारांसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी तायात घेऊन गाडीतून नेले .
800 किलोमीटर प्रवास करुन आलेली युवा संघर्ष यात्रेचा आज नागपूरात प्रवेश झाला. त्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत सभेत भाषण झाली. यावेळी रोहित पवार यांनी सरकारला इशारा दिला होता की, आमचे निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारने या ठिकाणी यावे, नाहीतर आम्ही विधानभवनात प्रवेश करू. त्यानंतर देखील सरकारकडून दखल घेतली गेली नाही. त्यानंतर कनिष्ठ पदावरील अधिकारी पाठवून आमचे निवेदन स्वीकारणे म्हणजे आमचा अपमान आहे. असे रोहित पवार म्हणाले. त्यानंतर सर्व युवक संतप्त झाले. त्यांनी विधानभवनाकडे मोर्चा वळवला. तेव्हा त्यांना पोलिसांनी अडवले.
पोलिसांकडून धरपकड सुरु
यावेळी युवा संघर्ष यात्रेतील तरुण संतप्त झाले. अखेर पोलिसांनी युवकांची धरपकड सुरु पोलिस व्हॅनमध्ये टाकण्याचे काम सुरु झाले. त्यामुळे रोहित पवार, रोहित पाटील हे देखील आक्रमक झाले. आम्ही शेतकऱ्यांचे व युवकांचे प्रश्न मांडत आहोत. आम्ही काही गुन्हा केला आहे का, असा सवाल त्यांनी केला? युवकांना तुम्ही ताब्यात का घेत आहात? यावर पोलिस व रोहित पवार यांच्यात शाब्दिक वाद सुरु झाला.
युवकांना न्याय मिळत नसेल तर आम्ही काय करायचे, तहसीलदार यांना पाठवून आमचा अपमान का करत आहात, असा सवाल देखील रोहित पवार यांनी केला. आमच्या प्रश्नावर सरकार चर्चा करणार आहे की नाही, असेही ते म्हणाले. तहसीलदार व भाजपच्या शहराध्यक्षांना पाठवून हे युवकांचा अपमान करु पाहत आहेत. शिंदे सरकार कमजोर आहे का? असे म्हणत ते आक्रमक झाले.

