काँग्रेस सरकार आल्यास 3000 रुपयांची महालक्ष्मी योजना:दरवर्षी 1000 रुपयांची वाढ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा

Date:

योजनेमध्ये दरवर्षी एक हजार रुपयांची वाढ करणार

मुंबई-राज्यामध्ये काँग्रेस सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेला तोडीस तोड अशी महालक्ष्मी योजना महिलांसाठी आणू. यात तर महिन्याला महिलांना तीन हजार रुपये देण्यात येतील आणि प्रत्येक वर्षाला त्यात हजार रुपयांची वाढ करू, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी केली आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेचे स्वागतच केले आहे. मात्र ती योजना कायम राहावी, भगिनींची दिशाभूल होऊ नये, बँकेत पैसे गेले ते बँक वाल्यांनी गायब केले, असे होऊ नये, असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

लाडकी बहीन योजनेवरुन राज्य सरकार इव्हेंट करत आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून लूट चालू असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला आहे. मात्र, भगिनींना बँकेत किती त्रास आहे माहित आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसचे सरकार आल्यास आम्ही या पेक्षा चांगली योजना आणणार असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. महालक्ष्मी योजनेच्या नावाने ही योजना आणणार असून त्यामध्ये मात्र महिलांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच त्यात दर व्रषी एक हजार रुपयांची वाढ करणार असल्याचे देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना जाहीर केल्यापासून महाविकास आघाडीच्या वतीने या योजनेवर टीका करण्यात येत आहे. त्यात आता नाना पटोले यांनी यापेक्षाही चांगली योजना आणण्याची घोषणा केली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये नाना पटोले यांनी काँग्रेसच्या वतीने या नव्या योजनेची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर आमच्या सरकारच्या या योजनेमध्ये दरवर्षी एक हजार रुपयांची वाढ करणार असल्याची घोषणा देखील नाना पटोले यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...

संगीतातून ईश्वर दर्शन-पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे  प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी...

भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल असे रशियाला वाटत नाही:ट्रंपवर विश्वास नाही

ट्रम्प यांचा दावा- भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल मॉस्को-रशियाने...