Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आई हाच सर्वश्रेष्ठ गुरू आणि आई हेच संस्कारपीठ

Date:

डॉ. पी. डी. पाटील यांचे गौरवोद्गार
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मंगला ईटकर यांना आदर्श आई पुरस्कार प्रदान

पुणे : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आई ही सर्वांत महत्त्वाची व्यक्ती असते. आई हाच सर्वश्रेष्ठ गुरू आणि आई हेच व्यक्तीचे संस्कारपीठ असते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी गुरुवारी येथे काढले. आदर्श मातृत्वाचा गौरव तिच्या पुत्राच्या उपस्थितीत आणि तोही शिक्षकदिनी व्हावा, हा दुग्धशर्करा योग आज जुळून आल्याचा उल्लेखही डॉ. पाटील यांनी याप्रसंगी केला.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱा ‌‘आदर्श आई पुरस्कार‌’ मंगला चंद्रशेखर ईटकर यांना डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. गुरुवारी सायंकाळी पत्रकार भवन, नवी पेठ येथे हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.

याव्ोळी शिखर बँकेचे अध्यक्ष आणि बँकिंगतज्ञ विद्याधर अनास्कर तसेच मंगला ईटकर यांचे चिरंजीव, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर व्यासपीठावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. पाटील यांनी मंगलाताई आणि त्यांचे पुत्र सचिन ईटकर यांच्या नात्याचे हद्य वर्णन केले. पुत्राचे कर्तृत्व पाहून, त्यासाठी आईने उपसलेले परिश्रम जाणवतात. मंगलाताई स्वतः ग्रामीण भागात शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शिक्षिका आई असणे, असे दुहेरी भाग्य सचिन यांना लाभले. आईने केलेले संस्कार, शिकवलेली मूल्ये आणि निष्ठा यांचे दर्शन सचिन यांच्या व्यक्तीत्वातून आज साऱ्यांसमोर आहे. सचिन यांच्या मनातील अपार मातृभक्ती सतत जाणवते, असेही डॉ. पाटील म्हणाले.

विद्याधर अनास्कर यांनी आई या शब्दातच अपरंपार माया असल्याचा उल्लेख केला. आई मुलाच्या नात्यावर जगभर लिहिले, बोलले गेले पण तरीही हे नाते त्यापलीकडेच राहिले आहे. मुलाची पहिली गुरू, पहिला आदर्श आईच असते. ती संस्कार देते, तेही स्वतःच्या आचरणातून. अशा आईकडून आजच्या काळातील आयांनी खूप शिकण्यासारखे आहे. मूल पोटात असल्यापासून आई आपल्या मुलाच्या काळजीत गुंतलेली असते. आई म्हणजे मूर्तिमंत सात्विकता आणि तोच खरा शिक्षक असतो. पण आईची शिकवण समजून घेण्याइतकी संवेदनशीलता आजच्या पिढीत आहे का, ही शंका अस्वस्थ करते, असे अनास्कर म्हणाले.

मनोगत मांडताना मंगलाताई म्हणाल्या, मी ग्रामीण भागात पहिली ते सातवी इयत्तेची शिक्षिका होते. सचिन लहानपणापासून हुशार, कुशाग्र बुद्धीचा आहे, हे माझ्या लक्षात आले होते. त्यानेही कर्तृत्व सिद्ध केले. मी हा सन्मान व्यक्ती म्हणून न स्वीकारता मुलांना उत्तम संस्कार देणाऱ्या सर्व मातांची प्रतिनिधी म्हणून स्वीकारते. हा पुरस्कार मला पाटील सर, अनास्कर सरांसारख्या मातृभक्त पुत्रांच्या हस्ते आणि तोही शिक्षक दिनाच्या दिवशी मिळाला, याचा विशेष आनंद वाटतो, असेही त्या म्हणाल्या.

सचिन ईटकर यांनी आईचा सन्मान हा आनंदाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली. साऱ्याचा उगमस्रोत आईच आहे. तिने प्रतिकूल परिस्थितीत समर्पित भावनेने आणि परिश्रमपूर्वक आम्हाला घडवले. उत्तम संस्कार दिले. प्रामाणिकपणा, सचोटी आणि समर्पण म्हणजे आई. तिला राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारही प्राप्त झाला आहे. ज्यांनी मातृभक्तीचे दर्शन घडवून यश प्राप्त केले, अशा दोन मान्यवर गुरूजनांकडून शिक्षक दिनाचे औचित्य साधून या पुरस्काराचे वितरण व्हावे, हे अतिशय औचित्यपूर्ण आहे‌’, असे ते म्हणाले.

रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात आडकर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याविषयी माहिती दिली. 32 वर्षे सलग उपक्रम करत असल्याचे ते म्हणाले.

शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन तसेच मानपत्राचे वाचन केले. प्रमोद आडकर यांनी आभार मानले.

फोटो : रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित आदर्श आई पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावाकडून) सचिन ईटकर, ॲड. प्रमोद आडकर, मंगला चंद्रशेखर ईटकर, डॉ. पी. डी. पाटील, विद्याधर अनास्कर.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...