पुणे-
सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण आपल्या कोथरूड परिसरात ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. आज आपल्या कर्वेनगर येथील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल या ठिकाणी हा कार्यक्रम आबालवृध्दांच्या भरभरून प्रतिसादात यशस्वीपणे संपन्न झाला.अशी माहिती राष्ट्रवादी चे अर्बन सेल शहर प्रमुख स्वप्नील दुधाने यांनी येथे दिली .
ते म्हणाले,’ ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीने तब्बल २०० ते २५० लहान मुलांनी तर महिला भगिनी आणि शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी निसर्गाच्या सानिध्यात या शिबिरास उपस्थिती दर्शवत या आनंदसोहळ्याचा निर्भेळ आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद आणि गणरायाला साकारल्यानंतर आलेले समाधान पाहून मन प्रसन्न बनले. नागरिकांच्या चेहऱ्यावरील हा आनंदच नव्याने दरवर्षी असे उपक्रम आयोजित करण्यासाठी ऊर्जा देत असून नागरिकांचे हे प्रेम आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहून हा पर्यावरणपूरक कार्यक्रम वर्षानुवर्षे असाच सुरू राहील, असा संकल्प यावेळी केला.