जे काम मुघल करु शकले नाहीत ते भाजपाच्या बेईमान लोकांनी केले; धमकीच्या स्वरात मागितलेली माफी मंजूर नाही: पवन खेरा

Date:

१९ व्या शतकात इतिहास कोण लिहित होते हे सर्वांना माहित, योग्य व्यक्तींनी लिहिलेलाच इतिहास वाचा: छत्रपती शाहू महाराज

मुंबई, दि. १ सप्टेंबर
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करुन भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवली आहे. महाराज आपले दैवत आहेत, भाजपाने त्यांचा धडधडीत अपमान केला आहे, या अपमानाविरोधात जोडे मारो आंदोलन आयोजित केले असताना शिवद्रोही व्यवस्थेने विरोध केला, परवानगी नाकारली. आता काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह देवेंद्र फडणवीस व भाजपा पसरवत आहे, फेक नॅरेटिव्ह पसरवणे हा भाजपाचा डिएनए आहे, असे प्रत्युत्तर देत आज मुंबईत जोडे मारो आंदोलन करण्यात आले असून उद्या २ तारखेपासून राज्यभर हे आंदोलन सुरु राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत’, असे पंडित जवाहरलाल नेहरु यांनी प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणावेळीच जाहीरपणे सांगितले होते. आता पंडित नेहरुंच्या नावाने देवेंद्र फडणवीस अपप्रचार करत आहेत. फडणवीस यांनी नेहरुंचे पुस्तक संपूर्ण वाचलेले दिसत नाही, अर्धवट माहितीच्या आधारावर ते बोलत आहेत. खोटे बोल पण रेटून बोल अशी भाजपाची पध्दत आहे. पंडित नेहरु यांच्याबद्दलचा अपप्रचार फडणवीस यांनी थांबवावा. राजकोट किल्ल्यावरील महाराजांच्या पुतळ्याचे काम ज्याने केले त्या आपटेला अद्याप अटक का केली नाही? तो कुठे पळून गेला? देवेंद्र फडणवीस यांनी अजून माफी का मागितली नाही? असे प्रश्नही नाना पटोले यांनी विचारले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे चेअरमन पवन खेरा यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याने महाराष्ट्राच्याच नाही तर देशभरातील जनतेच्या मनात प्रचंड राग आहे. फक्त पुतळा कोसळला नाही तर लोकांचे मन दुखावले आहे. जे काम मुघल करु शकले नाहीत ते भाजपाच्या बेईमान लोकांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपकार केल्याच्या अविर्भात माफी मागितली, धमकीच्या स्वरात मागितलेली माफी मंजूर नाही. भाजपा शिवद्रोही असून त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. शिवाजी महाराजांच्या अस्मितेशी चालवलेला खेळ खपवून घेतला जाणार नाही अस खेरा म्हणाले.

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पवन खेरा म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पंडित नेहरु यांचे Discovery of India हे पुस्तक संपूर्ण वाचलेले दिसत नाही. जेलमध्ये असताना संदर्भ मिळाले नाहीत, दुसऱ्या आवृत्तीत सुधारणा करण्यासाठी पंडित नेहरुंनी १९३६ साली पी. आर. देवगिरीकर तसेच श्रीप्रकाश यांना ३ मे १९३६ रोजी पत्र पाठवून संदर्भ मागितले होते व पुढच्या आवृत्तीत सुधारणा केली असे पवन खेरा यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा प्रकार राजकारणापलिकडचा आहे, या घटनेने जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. १९ व्या शतकात कोण इतिहास लिहित होते हे सर्वांना माहित आहे, योग्य व्यक्तींनी लिहिलेलाच इतिहास वाचला पाहिजे असे शाहू महाराज म्हणाले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार छत्रपती शाहू महाराज, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे चेअरमन पवन खेरा, CWC चे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे, प्रवक्ते गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अतिउच्चदाब उपकेंद्रात पुन्हा बिघाड,भोसरी व पिंपरीतील वीजपुरवठ्यावर परिणाम

महावितरणकडून वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन पुणे : महापारेषण कंपनीच्या २२० के.व्ही. भोसरी अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० एमव्हीए (MVA) क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रामध्ये रविवारी (दि.१५) रात्री ११.१० वाजेच्या सुमारास अंतर्गत बिघाड झाला आहे. परिणामी या अतिउच्चदाब रोहित्रावर अवलंबून असलेला ८० एमव्हीएचा वीजभार बाधित झाला असून भोसरी व पिंपरी विभागातील वीज ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे महावितरणने या भागातील वीजग्राहकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. बाधित भागाची नावे- •             एस ब्लॉक •             जे ब्लॉक •             डी २ ब्लॉक •             एफ २ ब्लॉक •             टी ब्लॉक •             इंद्रायणीनगर •             भोसरीगाव •             जलवायू विहार •             गंधर्व नगरी •             सेक्टर ६,४ •             नेहरू नगर •             संत तुकाराम नगर •             दापोडी •             कासारवाडी पर्यायी व्यवस्थेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न दि. ०२ फेब्रुवारी,२०२६ महापारेषण कंपनीच्या  याच २२० के.व्ही. भोसरी अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० एमव्हीए (MVA) क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्र अंतर्गत बिघाड झाला होता. त्यावेळी देखील महावितरणच्या भोसरी व पिंपरी  विभागामार्फत पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न  करण्यात आले होते. सद्यस्थितीत देखील महावितरणच्या भोसरी व पिंपरी  विभागामार्फत पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न  सुरुच आहेत. दिवसभरात इतर वीजवाहिन्यांवर अतिरिक्त भार टाकून वीजपुरवठा सुरु करण्यात यश आले. परंतु, अतिरिक्त भारामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो. त्यावरही महावितरणकडून त्वरित उपाय योजना करण्यात येईल. वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन अचानक उद्भवलेल्या या वीज संकटावर मात करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. अशावेळी वीज ग्राहकांनीही महावितरणला सहकार्य करावे, विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी परिसरातील विविध विकासकामे तातडीने मार्गी लावा

पुणे - प्रभाग क्र.०९ बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी परिसरातील विविध विकासकामे तातडीने...

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा पण भाजपाला एक्सपोज करणे मी थांबणार नाही: हर्षवर्धन सपकाळ

देशातील ज्वलंत प्रश्नावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी टिपू सुलतानच्या...

टिपू सुलतानांचे वंशज भाजपमध्ये गेल्यास त्यांनाही पदे दिली जातील:हर्षवर्धन सपकाळांचा पलटवार

सावरकरांच्या सहा सोनेरी पाने, या पुस्तकाचाही उल्लेख संविधानातच टिपू...