राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे. तरीदेखील राज्यातील जनतेच्या प्रश्नाला महत्त्व न देता भाजप सरकार अन्य गोष्टींवर लक्ष देत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर विशेषतः भाजपवर केली आहे. लाडकी बहिण योजना ही कायम करण्याचं सरकारचे धोरण आहे. मात्र सरकार केवळ दीड हजार रुपये देऊन लोकांना गुलाम बनविण्याचे काम करत असल्याचेही आंबेडकर म्हणालेत.
सत्ताधारी स्वतःच्या विरोधातच आंदोलन करत आहेत. पंतप्रधान- मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पण गृहमंत्र्यांनी अद्याप माफी मागितली नाही, अशी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. पुतळा पडला की पाडला यांची चौकशी व्हावी. मातीचे प्लास्टिकचे पुतळे 45 किलो मीटर हवा अली तरी हे पडले नाहीत. मग हा पुतळा नेमका का पडला? असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला.
ओबीसीसाठी मी दौरे करीत आहे. सर्व पक्ष अजून ओबीसी आणि जरांगे यांच्या प्रश्नवरती का बोलत नाहीत. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये रोष पसरत चाललाय. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या समूहातील लोकांनी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. वरिष्ठ लोकांनी काँग्रेस पक्षाचे काम केले. वर्गीकरणाबरोबरच क्रिमिलियर ही अट घालण्यात आली. जे तंत्र जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वच पक्षातील नेत्यांना जाब विचारला. लोकसभेपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा ही परिस्थिती निर्माण होईल. राज्य सरकार या परिस्थितीला कंट्रोल करण्यात फेल झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना केवळ RSS आणि भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. हिंसेची भाषा करून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. यामुळेच समाजात सायको निर्माण होत आहेत. समाजात हिंसाचार पसरवण्यापेक्षा लालबहादूर शास्त्री यांचे धोरण का अवलंबत नाहीत. शास्त्री यांचे होत हम दोन हमारे दोन हे धोरण अवलंबण्यास कारण काय? असा सवालदेखील आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच, सरकारच्या हातून सत्ता काढून घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.