बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांतदादा पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक,बालेवाडी-वाकड रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करा!

Date:

पुणे – बाणेर, बालेवाडी-सुतारवाडी-पाषाण-सोमेश्वरवाडी भागातील विविध समस्यांसंदर्भात चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी बालेवाडी-वाकड रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे, असे निर्देश चंद्रकांतदादा पाटील आज दिले‌. तसेच, सुतारवाडीतील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या नादुरुस्त असल्याने त्या तातडीने दुरुस्त कराव्यात, त्यासाठी आमदार निधीतून तरतूद करु असे सूचित केले. यावेळी भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजपा नेते लहू बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील वाकड ते बालेवाडी पुलाचे काम सुरू आहे.

पुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र पुण्याकडील बाजूच्या ३०० मीटरच्या रस्त्याचे काम जमीन संपादनाच्या प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे अपूर्ण आहे. ही जागा तडजोडीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात दिली होती‌. सदर प्रक्रीया जलदगतीने पूर्ण करुन, रस्त्याचे काम पूर्ण करावे असे निर्देश दिले.यासोबतच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे पाषाण, सुतारवाडी मधून वाहणाऱ्या रामनदीला पूर आला. त्यातच पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या बंद असल्याने सर्व पाणी स्मशानभूमीत भरले होते. त्यामुळे पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्या तातडीने दुरुस्त कराव्यात; त्यासाठी आमदार निधीतून तरतूद करण्यात येईल, अशी सूचना ही त्यांनी यावेळी केली. पावसाचा जोर ओसरला असून; बाणेर-पाषाण लिंक रोडच्या ३६ मीटरचे काम जलदगतीने पूर्ण करावे असे निर्देश दिले. तसेच, आयवरी इस्टेट ते सोमेश्वर वाडी निम्हण मळा या रस्ताचे कामही जलदगतीने पूर्ण करावे अशी सूचना केली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाषाण-सूस रोड येथील कचरा संकलन केंद्र बंद करुन; नांदे येथील पीएमआरडीएच्या जागेत स्थलांतरित करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात असून, यामुळे बाणेर-बालेवाडी-पाषाण-सूस मधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल नामदार पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, कोथरुड मधील करिश्मा सोसायटीला अपूरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा, कसेही निर्देश दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्वेनगर दुर्घटनेतील जखमी रुग्णाची महापौर मंजूषा नागपूरे यांनी दीनानाथ रुग्णालयात घेतली भेट

पुणे :कर्वेनगर येथील मेघराज सोसायटीसमोर झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापण्यासाठी...

नदीपात्र खराब करणारांवर तातडीने कडक कारवाई करा – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे- पुण्याच्या नदीपात्रात कचरा , राडारोडा टाकून अगर अन्य...

तिसऱ्या तिमाहीत भारत फोर्ज ला संरक्षण क्षेत्रातील १,८७८ कोटी रूपयांच्‍या ऑर्डर्स

भारत फोर्जकडून आर्थिक वर्ष २०२६ च्‍या तिसऱ्या तिमाहीत प्रबळ...

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही प्रशासनाकडून दिरंगाई ही खूप क्लेशदायी -आ.हेमंत रासने

शहराच्या मध्यवर्ती भागातील भुयारी मार्गांचा डीपीआर तात्काळ करा! -आ.हेमंत...