रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी सन्मान
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे आदर्श आई पुरस्काराने मंगला चंद्रशेखर ईटकर यांचा गौरव केला जाणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार, दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:45 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्काराचे वितरण डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते होणार असून मातृभक्त, शिखर बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर तसेच मंगला ईटकर यांचे चिरंजीव, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.