Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पीएमपीएमएलसाठी दीड हजार बसेस त्वरीत घ्याव्यात, अन्यथा आंदोलन-माजी आमदार मोहन जोशी

Date:

पुणे – शहरातील लाखो प्रवाशांना दिलासा देण्यासाठी (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) पीएमपीएमएलने दीड हजार बसेस त्वरीत खरेदी कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पीएमपी प्रशासनाला आज गुरुवारी दिला.

काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली पीएमपीएमएलच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात चंद्रशेखर कपोते, रमेश अय्यर, बाळासाहेब अमराळे, सुनील मलके, ॲड.शाबीर खान, प्रशांत सुरसे,चेतन अगरवाल, सुरेश कांबळे,सागर कांबळे,अनिकेत सोनवणे,कृष्णा साठे आदी सहभागी होते.

बसने प्रवास करणाऱ्यांची दररोजची संख्या सरासरी १३ लाख आहे. विद्यार्थी आणि नोकरदार या सेवेवर अधिक अवलंबून आहेत. पण सध्या बसची वाट पहात तासन् तास प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. बसथांब्यांवर शेड नसल्याने प्रवाशांची अधिकच गैरसोय होते. प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो. प्रशासनाने आधुनिक पद्धतीने सुसज्ज बसशेड्स उभ्या करायला हव्यात. अशा प्रकारे प्रवाशांना आणखी किती काळ वेठीस धरणार आहात? असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.

सध्या १६०० बसेस मार्गावर धावत असतात. त्यातच दररोज ५० बसेस ब्रेक डाऊन होऊन बंद पडतात. त्यामुळे बसफेऱ्या ऐनवेळी रद्द होतात. याकरिता बस सेवेत सुधारणा होण्यासाठी दीड हजार बसेस तातडीने खरेदी केल्या जाव्यात. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार नाही, बस फेऱ्या रद्द होणार नाहीत. सार्वजनिक बससेवा सक्षम होऊन शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच पीएमपीएमएलचा दरमहाचा जमा खर्चाचा हिशेब पुणेकरांना नियमितपणे दिला जावा. कारभार अधिक पारदर्शी होण्यासाठी ही मागणी केल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

येत्या ४महिन्यात ७०० बसेस सेवेत दाखल होतील
-दिपा मुधोळ मुंडे

प्रवाशांची सोय लक्षात घेऊन येत्या ४ महिन्यात पीएमपीएमएलच्या बस ताफ्यात ७०० बसेस नव्याने दाखल होतील.त्यात ४०० बसेस पीएमपीएमएलच्या आणि ३०० बसेस ठेकेदारांकडून घेतल्या जातील,असे आश्वासन मुख्य व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे यांनी शिष्टमंडळाला दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विमान वाहतूक कोसळली: काय म्हणाले मंत्री मोहोळ

इंडिगोने पायलटच्या कामाची वेळ पाळली नाही: ४ सदस्यीय चौकशी...

अजित पवारांबरोबर नाहीच , महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, खुद्द शरद पवारांची मान्यता – प्रशांत जगताप

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस...