रिदमिक योगासन स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या महिका पटवर्धनला सुवर्णपदक

Date:

 
पुणे, दि.११डिसेंबर : १४ वर्षाखालील रिदमिक योगासन क्रीडा प्रकारात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या महिका पटवर्धन ने चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले.  ध्रुव ग्लोबल स्कूलचे नाव विभागीयस्तरावर उंचावले आहे. अत्यंत लवचिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने रिदमिक योगासन करणारी महिकाने सर्वांचीच मने जिंकली. तिच्या सादरीकरणाला उत्कृष्ट दाद मिळाली. तीच्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
अहमदनगर येथील वाडिया पार्क जिल्हा संकुल मध्ये शालेय विभागीय योगासन स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत पूणे विभागातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये वैयक्तिक १४ वर्षाखालील मुलींच्या रिदमिक योगासन क्रीडा प्रकारात ७ व्या वर्गातील महिका पटवर्धन ने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही महिका ने अनेक योगासन स्पर्धेत पदके मिळवली आहेत. ही स्पर्धा १४, १७ आणि १९ वयोगटातील मुले व मुलींसाठी होती. प्रशिक्षक गायत्री वारे व वैष्णवी आंद्रे यांनी तिला मार्गदर्शन केले.  तीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारने धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...