आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणारे तिघे गजाआड
पुणे- सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने खुनी हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगारांना १२ तासाच्या आत बेड्या घालण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. निहाल सिंग मन्नुसिंग टाक व राहुल सिंग रविंद्रसिंग भोंड (दोघे रा.कॅनल रोड हडपसर पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की दिनांक २५/०८/२०२४ रोजी सय्यदनगर बंद रेल्वे गेटजवळ दोन दुचाकी चालकांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षक रत्नाकर गायकवाड यांचेवर निहाल सिंग मन्नु सिंग टाक व राहुल सिंग रविंद्रसिंग भोंड यांनी खुनी हल्ला करुन दहशत करुन पळुन गेले आहेत म्हणुन त्यांचे विरुध्द वानवडी पोलीस ठाणे गु. र. नं. ४७३/२०२४ भा. न्या. संहिता २०२३ चे कलम १३२,१०९,११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) सह आर्म अक्ट कलम ४(२५) महा. पो. अधि. कलम ३७(१) (३) सह १३५ क्रिमिनल लॉ अमेंडमेट अॅक्ट ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदरचा गुन्हा केल्या पासुन, त्यातील आरोपी निहाल सिंग मन्नुसिंग टाक व राहुल सिंग रविंद्रसिंग भोंड हे पळुन गेलेले होते. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त,परिमंडळ-५, आर राजा, पोलीस उप आयुक्त, गुन्हे निखिल पिंगळे, यांनी दाखल गंभीर गुन्हयाचा संमातर तपास करुन आरोपीना ताब्यात घेणेबाबत आदेश दिले. प्राप्त आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अजय वाघमारे, युनिट ४ यांनी युनिट-४ कडील पोलीस उपनिरीक्षक, वैभव मगदुम व पोलीस स्टाफ व युनिट ५ कडील सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व पोलीस स्टाफ असे पथक तयार केले. तपास पथकाने दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपींचा ठाव ठिकाण्याबाबत कसोशिने तपास करीत असताना पोलीस हवालदार अजय गायकवाड, युनिट-४ यांना त्यांचे बातमीदाराने गुन्ह्यातील पाहिजे आरोपी निहाल सिंग व राहुल सिंग हे ट्रॅव्हल्स बसमधुन सोलापुरकडे पळुन जात आहेत अशी माहिती दिली. प्राप्त बातमी वरिष्ठांना कळविण्यात आली असता पोलीस उप आयुक्त गुन्हे, यांनी बातमीचे अनुषंगाने पुणे सोलापुर हायवेवरती नाकाबंदी करणेबाबत सोलापुर ग्रामीण पोलीसांना कळविले. त्याप्रमाणे टेंभुर्णी पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक, गावडे व पोलीस स्टाफ यांनी नाकाबंदी सुरु केली. नाकाबंदीचे ठिकाणी युनिट-४ व युनिट-५ कडील अधिकारी व पोलीस स्टाफ तेथे पोहोचले. त्यानंतर आरोपी प्रवास करीत असलेली बस नाकाबंदीचे ठिकाणी आली. बस अडवुन त्यातील आरोपी निहाल सिंग मन्नु सिंग टाक व राहुल सिंग रविंद्रसिंग भोंड दोघे रा. कॅनल रोड हडपसर पुणे यांना पकडुन जेरबंद केले. त्यांचेकडे प्राथामिक तपास करुन त्यांना पुणे येथे आणुन वानवडी पालीस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ सतिश गोवेकर, युनिट-४ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, हरिष मोरे, प्रविण भालचिम, संजय आढारी, विनोद महाजन, जंहागीर पठाण, राहुल परदेशी, विशाल गाडे, व युनिट-५ कडील सहा. पोलीस निरीक्षक, कृष्णा बाबर व टेंभुर्णी पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक, गावडे व पोलीस स्टाफ यांनी केली आहे. तसेच सदर गुन्हयाचा संमातर तपास वानवडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पतंगे व त्यांचे पथकाने केली.
आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणारे तिघे गजाआड
निहाल सिंग मनसिंग टाक आणि राहुल सिंग रवींद्र सिंग भोंड या दोघांना पळून जाण्यास मदत करणारा इसम नामे अमरसिंग जगर सिंग टाक यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 4 सप्टेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे घटनास्थळावरून त्यांना पळून जाण्यास मदत करणारे अनिल बनसोडे आणि सुरज भंडारी राहणार तरवडे वस्ती यांनाही ताब्यात घेतले असून अटक करण्यात आले आहे. आतापर्यंत गुन्ह्यात अटक करण्यात आलेली संख्या पाच असून त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत
1) निहाल सिंग मनसिंग टाक व 19 वर्ष राहणार वेताळबाबा वसाहत बंटर शाळेमागे हडपसर पुणे
2) राहुल्या उर्फ राहुल सिंग रवींद्र सिंग भोंड व 19 वर्ष राहणार तुळजाभवानी वसाहत मोठ्या कॅनल लगत हडपसर पुणे
3) अमरसिंग जगरसिंग टाक वय 23 वर्ष राहणार इंद्राणी वस्ती गल्ली नंबर 3 पाटील इस्टेट शिवाजीनगर पुणे
4) सुरज महादेव भंडारे वय 20 वर्ष राहणार तरवडे वस्ती साठे नगर पाण्याच्या टाकीजवळ महंमदवाडी पुणे
5) अनिल दशरथ बनसोडे व 24 वर्ष राहणार तरवडे वस्ती साठे नगर पाण्याच्या टाकीजवळ महंमदवाडी पुणे