पुणे :गुरुवार पेठेतील कृष्णा हाईटस बिल्डिंगच्या टेरेसवरील खोलीमध्ये सुरु असलेल्या किशोर सातपुते याच्या जुगार अड्ड्यावर खंडणी विरोधी पथकाने छापा घातला. तेथे जुगार अड्डा चालविणारे व तीन पत्ती जुगार खेळणारे अशा १० जणांना अटक केली आहे.
शाहरुख अख्तर पठाण (वय ३०, रा. कासेवाडी, भवानी पेठ), ज्ञानेश्वर बालाजी यामजले (वय ३९, रा. संतोषनगर, कात्रज), साहिल इब्राहिम साठी (वय २१, रा. चव्हाणनगर), अरुण गोरखनाथ माने (वय ४५, रा. केशवनगर, धनकवडी), जीवन शिवाजी बडे (वय २६, रा. संभाजीनगर, कात्रज), अनंत सतीश खिंवसरा (वय ४४, रा. मार्केटयार्ड), अतुल रामभाऊ बोडके (वय ३५, रा. पिंपळे गुरव), मंगेश सुरेश परदेशी (वय ३७, रा. धनकवडी), विकी सुभाष बनसोडे (वय ३५, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड), ओमकार जयराम जगताप (वय २६, रा. दांडेकर पुल, दत्तवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच किशोर बाळू सातपुते (रा. दांडेकर पुल) या जुगार अड्डा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार सयाजी चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील
, विजयकुमार शिंदे , पोलीस हवालदार सयाजी चव्हाण, नितीन कांबळे,
गितांजली जांभुळकर, राजेंद्र लांडगे, मयुर भोकरे हे पेट्रोलिग करत असताना हवालदार सयाजी चव्हाण व मयुर भोकरे
यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कृष्णा हाईटसच्या टेरेसवरील खोलीत जुगार खेळत आहे.
पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केल्यावर टेरेसवरील खोलीत काही जण तीन पत्ती जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी १० जणांना अटक करुन पत्त्याचा कॅट, रोख रक्कम असा १४ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. खडक पोलीस अधिक तपास करत आहेत.