डेपोलाईन व्यायामशाळा, कॉंक्रीटीकरण, नवीन ड्रेनेज लाईनचे काम, पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी कामांना शिरोळे यांच्या उपस्थितीत झाली सुरुवात
पुणे, दि. २३ ऑगस्ट, २०२४ : आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीतून खडकी भागातील ९० लक्ष रुपयांच्या अनेकविध विकासकामांना सुरुवात झाली असून नुकतेच या सर्व प्रकल्पांचे भूमीपूजन संपन्न झाले.
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील खडकी भागातील सुरु झालेल्या कामांमध्ये खडकी डेपोलाईन व्यायाम शाळा येथे १० लक्ष रुपयांची कामे, खडकी गवळीवाडा भागात श्री. साईबाबा मंदिराजवळ कॉंक्रीटीकरणाची १० लक्ष रुपयांची कामे, धोबीगल्ली येथील मरीमाता मंदिराजवळ कॉंक्रीटीकरणाची १० लक्ष रुपयांची कामे, धोबीगल्ली येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी १० लक्ष रुपयांची कामे, रेल्वे स्टेशन रोड येथे पेव्हिंग ब्लॉकच्या कामासाठी रुपये १० लक्षची तरतूद, संगम मित्र मंडळ परिसरात कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष रुपयांची कामे, अखिल खडकी मातंग सेवा संस्थाच्या सामाजिक सभागृह येथील विविध विकास कामांसाठी रु १० लक्ष तरतुद अशा अनेकविध कामांचा समावेश आहे, अशी माहिती सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
यासोबतच खडकी लक्कावाडा येथील आझाद मित्र मंडळ सामाजिक सभागृह येथे विविध विकास कामे करण्यासाठी १० लक्ष रुपये, कुंदन कुशल सोसायटी बाहेरील रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष रुपये या कामांचे देखील भूमिपूजन झाले असून आता ही कामे लवकरात लवकर पूर्ण होतील असे शिरोळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमांवेळी आनंद छाजेड, संगिताभाभी गवळी, दुर्योधन भापकर, अभय सावंत, मुकेश गवळी, अजित पवार, नेहाताई गोरे, श्याम काची, मनीषाताई कांबळे, प्रकाश सोलंकी, रमेश भंडारी, निलेश रेणुसे, योगेश कर्नुर, रोहन मगर, अनिता केदारी, शर्मिला राडे, दत्ता बनसोडे, रजनी आहेर, प्रिया गुरु, गोपाळ वाघमारे, रिकेश पिल्ले, भरत रास्ते, गणेश पोलकम, रोहन मोरे, राजेश रजपुत, चेतन मुदलियार, अक्षय पवार, मिलिंद खाडे, प्रितेश पवार, राजेंद्र जाधव, सोमनाथ जाधव, सारीका येरुणकर, विशाल तेलंगी, सुशिल गरसुंद, योगेश आहेर, बाळाभाऊ कुंडगर, सौरव गोणेवार, अक्षय घोडकेक, मुजाहिद हुसेन, अनिकेत जाधव तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
याबरोबरच महादेववाडी येथे नुकतेच स्वर्गीय तुकाराम भापकर प्रतिष्ठान यांच्या मार्फत गेल्या महिन्यात पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते अन्न धान्य किट वाटप करण्यात आले. यावेळी आनंद चज्जेड, दुर्योधन भापकर, मुकेश गवळी, प्रकाश सोळंकी, संगिता गवळी, अभय सावंत, राहुल कांबळे, अजित पवार, श्याम कच्ची, नेहा गोरे, केदारी ताई, हेमा ताई, रोहन मगर, मनीषा कांबळे, योगेश कन्नूर, रिकेश पिल्लई, गोपाल जी, रमेश भंडारी, मुजाहिद हुसेन, अनिकेत जाधव, निलेश रेणुसे आणि महादेववाडी नागरिक उपस्थित होते.