महिला सुरक्षिततेची सरकार जबाबदारी घेत नाही – प्रवाक्ता शमा मोहंम्मद
पुणे -पश्चिम बंगाल आणि बदलापूर येथील दोन्ही घटना निषेधात्मक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे. बलात्कार करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालत आहे. बाबा राम रहीम, ब्रीजेशसिंग, मणिपूर प्रकरणात वारंवार याबाबत भाजपची दुटप्पी भूमिका जनतेने पहिली आहे. महाराष्ट्रामधील शासन रसातळाला गेले आहे. महिला असुरक्षित बाबत कोणी जबाबदारी घेत नाही, असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवाक्ता शमा मोहंम्मद यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
शमा मोहंम्मद म्हणाल्या, “महिलांवर ज्याठिकाणी अत्याचार होतात त्याबाबत काँग्रेस आवाज उठवत राहणार आहे. पालक विश्वासाने मुलांना शाळेत पाठवत असतात तिथे सुरक्षित वातावरण बनवणे सरकारची जबाबदारी आहे, असे मत यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार दीप्ती चौधरी , कमल व्यवहारे, संगीता तिवारी उपस्थित होत्या.
शमा मोहंम्मद पुढे म्हणाल्या, “बदलापूरमध्ये शालेय विद्यार्थिनींवर जे अत्याचार झाले त्यातून महिला, मुली सुरक्षित नसल्याचे दिसून येते. चार वर्षाच्या मुली शाळेत बाथरूममध्ये गेलेल्या असताना, त्यांच्यावर स्वच्छ्तागृह कर्मचारी अक्षय शिंदे याच्याकडून दुष्कृत्य करण्यात आले.”
या प्रकरणात पोलिसांनी वेळीच कारवाई, गुन्हा दाखल केला नाही कारण शाळेचे व्यवस्थापक भाजपशी निगडित आहेत. आंदोलनकर्त्यांवर तातडीने कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले. शाळेतील सीसीटीव्ही कार्यरत असताना तो बंद दाखवला गेला. भाजपचा लोकसभा निवडणूक उमेदवार याप्रकरणात सरकारी वकील म्हणून नेमण्यात आला ही बाब निषेधार्थ असल्याचेही त्या म्हणाल्या.