पुणे-डब्ल्यू आर आय इंडिया व पुणे महानगरपालिका पर्यावरण विभागामार्फत शहरातील विकासक डेव्हलपर ,साईट इंजिनिअर तसेच पीएमआरडीए क्षेत्रातील विविध शासकीय कार्यालयातील अभियंते यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यशाळा पुणे महानगरपालिकेच्या पंडित जवाहरलाल नेहरू अडोटिरीम घोले रोड येथे आज दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे माननीय अतिरिक्त आयुक्त श्री पृथ्वीराज बीपी,पर्यावरण विभागाचे उपायुक्त श्री संजय शिंदे, पर्यावरण संवर्धन अधिकारी श्री मंगेश दिघे,क्रीडाई पुणे चे अध्यक्ष श्री नाईक नवरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त नगर अभियंता संजय कुलकर्णी, डब्ल्यू आर आय इंडिया डायरेक्टर श्री कुमार स्वामी ,व्याख्याते व इंजिनिअर श्री संदीप नारायण, शहरातील विकासक व अभियंते सदर कार्यशाळेला उपस्थित होते.केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम या कार्यक्रमांतर्गत शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र शासनाकडून पुणे महापालिकेला आतापर्यंत 162 कोटी रुपये मिळाले असून पुढील दोन वर्षात साधारणतः अजून 139 कोटी रुपये प्राप्त होणार आहेत सदर प्राप्त होणाऱ्या निधीतून विविध विभागामार्फत शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विकास कामे केले जाणार आहेत.त्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून यांच्या आज एक दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये शहरांमध्ये खाजगी विकासा मार्फत जे विविध प्रकल्प सुरू आहेत तसेच मेट्रो प्रकल्प पुणे महापालिकेच्या वतीने सुरू असलेले विविध विकास कामे हे कामे करीत असताना त्या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धूळ तयार होऊन ती हवेमध्ये मिक्स होते व त्यामुळे हवेची गुणवत्ता बिघडते यावर उपाययोजना करण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये माननीय अतिरिक्त आयुक्त श्री पृथ्वीराज बीपी यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन करताना पुणे शहराची हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यकता उपाय योजना महापालिकेच्या वतीने सुरू असून त्यामध्ये विकासक डेव्हलपर यांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याबाबत विशेष नमूद केले तसेच त्यांनी पुढील पाच वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीतून हवेची गुणवत्ता सुधारत असताना पी एम टेन ची पातळी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले तसेच पुणे शहर हे निसर्गसौंदर्याने नटलेले असून या शहरातील नागरिकांना चांगली हवा उपलब्ध व्हावी यासाठी सर्वांनीच एकत्रित येऊन प्रयत्न करणं आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सदर प्रसंगी क्रीडाई संचालक श्री नाईक नवरे यांनी महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपाय योजनांमध्ये सक्रिय सहभाग विकासाचा राहणार असून महापालिकेने नमूद केलेल्या सर्व बाबीचे नियमाचे पालन करणार असल्याचे तसेच याबाबत बिल्डर असोसिएशनची मीटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यार असल्याचे नमूद केले तसेच त्यांनी सदर कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल डब्ल्यू आर आय इंडिया आणि पुणे महानगरपालिका यांचे अभिनंदन केले सदर प्रसंगी डब्ल्यू आर आय इंडियाचे संचालक श्री कुमार स्वामी यांनी धुळीच्या कणामुळे हवेमध्ये जो प्रदूषण निर्माण होते त्यावर उपाययोजना करण्याचे अनुषंगाने उपस्थित सर्व विकासाक इंजिनियर्स यांना प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तसेच सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून होणारे प्राप्त होणारे विविध आदेश आणि त्या त्याची अंमलबजावणी करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.