मुंबई – बँक ऑफ इंडिया या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एका बँकेने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक यांनी मुंबईतील प्रमुख कार्यालयात संचालक मंडळाच्या उपस्थितीत ‘नारी शक्ती बचत खात्याचा’ शुभारंभ केला. १८ वर्ष आणि त्यापुढील वयोगटातील, कमावत्या स्त्रियांच्या आर्थिक उत्पादनविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी हे नवे खाते सुरू करण्यात आले आहे. या बचत खात्यावर विविध सुविधा देण्यात येणार असून त्यात १०० लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक अपघात जीवन विमाकवच, सवलतीच्या दरात आरोग्य विमा आणि स्वास्थ्य उत्पादन, गोल्ड आणि डायमंड बचत खातेधारकांसाठी आकर्षक सवलती, तर प्लॅटिनम बचत खातेधारकांना मोफत लॉकर सुविधा, किरकोळ कर्जावर सवलतीचा व्याज दर, किरकोळ कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ, क्रेडिट कार्ड वितरण आणि पीओएसवर ५ लाख रुपयांपर्यंतची कमाल वापर मर्यादा या सुविधा देण्यात येणार आहे. नारी शक्ती बचत खाते स्वतंत्रपणे उत्पन्न मिळवणाऱ्या नोकरदार महिलांसाठी लाभदायक, आर्थिक बचत शक्य करणारे असून त्याच्या मदतीने महिलांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनून आर्थिक स्वातंत्र्याचा लाभ घेता येईल. बँकेत उघडण्यात आलेल्या प्रत्येक नारी शक्ती खात्यासह सीएसआर निधीमध्ये १० रुपयांचे योगदान दिले जाणार असून या सीएसआर रकमेचा वापर वंचित महिला/मुलींच्या आर्थिक विकासासाठी केला जाणार आहे. नारी शक्ती बचत खाते आमच्या सर्व ५१३२ शाखा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही उघडले जाऊ शकते.
बँक ऑफ इंडियातर्फे विशेष योजना व ऑफर्ससह नारी शक्ती बचत खात्याचा शुभारंभ
Date:

