बाणेर मध्ये अनोखे रक्षाबंधन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून महिला सफाई कर्मचाऱ्यांना अनोखी भेट

Date:

पुणे-

बहीण-भावाचं नातं दृढ करणारी राखी पौर्णिमा बुधवारी घरोघरी उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या बांधवांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली‌. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून बाणेर मध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. 

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून बाणेर-पाषाण लिंक रोड येथील ऑकेजन्स हॉल येथे सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपला परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई महिला कर्मचाऱ्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच, ओवाळणी म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या.

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, लहू बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, गणेश कळमकर, राहुल कोकाटे, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, उत्तर मंडल सरचिटणीस उमाताई गाडगीळ, महिला मोर्चाच्या अध्यक्षा अस्मिता करंदीकर, युवा मोर्चा अध्यक्ष रोहन कोकाटे, दक्षिणचे सरचिटणीस दीपक पवार, विवेक मेथा यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचलन सुभाष भोळ यांनी केले आणि सचिन दळवी यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...