मुलींनों, कॉलेज तुमच्याकडून‎शुल्क घेत असेल तर तुम्ही या 7969134440‎ ‎हेल्पलाइन नंबरवर तक्रार करा‎

Date:

छत्रपती संभाजीनगर‎-आठ लाखांच्या आत पालकांचे‎वार्षिक उत्पन्न असेल तर त्यांच्या‎मुलींना मोफत शिक्षणाच्या निर्णयाला‎राज्यातील बहुतांश कॉलेज हरताळ‎फासताहेत. अभियांत्रिकी, फार्मसी,‎पॉलिटेक्निकसह सर्वच विद्याशाखांचे‎कॉलेज अजूनही विद्यार्थिनींकडून‎शुल्क घेत असल्याच्या तक्रारी आहेत.‎त्यामुळे सहसंचालकांनी भरारी‎पथकाद्वारे कॉलेजांवर कारवाईच्या‎सूचनाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री‎ चंद्रकांत पाटील यांनी दिल्यात. आता‎तर ७९६९१३४४४० व ७९६९१३४४४१‎दोन हेल्पलाइन नंबर दिले आहेत.‎सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत या‎मोबाइल क्रमांकांवर पालक,‎विद्यार्थिनी तक्रार करू शकतात.‎

मुलींच्या मोफत शिक्षणाच्या प्रभावी‎अंमलबजा वणीसाठी राज्य सरकार‎विविध उपाययोजना करत आहे.‎त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील‎उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक‎आणि तंत्रशिक्षण विभागाच्या‎सहसंचालकांना भरारी पथकाद्वारे‎कारवाई करण्याच्या सूचना दिल्या‎आहेत. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीनेही‎छत्रपती संभाजीनगर विभागाचे‎सहसंचालक उमेश नागदेवे आणि‎ओएसडी डॉ. सीमा बोर्डे यांच्या‎पथकासोबत जाऊन १३ ऑगस्टला‎दोन कॉलेजांची पाहणी केली. त्या‎वेळी श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ‎फार्मसी अँड रिसर्च विद्यार्थिनींकडून‎शुल्क आकारत असल्याचे निदर्शनास ‎‎आले होते. त्याचा सविस्तर रिपोर्ट १४ ‎‎ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध केला होता. ‎‎खासगी संस्थाचालकांच्या मुजोरीला ‎‎आळा बसवण्यासाठी आता‎उच्चशिक्षण विभागाने हेल्पलाइन नंबर ‎‎प्रसिद्ध केलेत. ७९६९१३४४४० व ‎‎७९६९१३४४४१ या क्रमांकांवर फोन‎करून विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक ‎‎आपल्या तक्रारी नोंदवू शकतात.‎शिवाय कॉलेजांनी शैक्षणिक आणि‎परीक्षा शुल्क मागितल्यास निर्भीडपणे‎पुढे यावे, असे आवाहन केले आहे.‎मात्र मॅनेजमेंट कोट्यातून अॅडमिशन ‎‎घेणाऱ्यांना पूर्ण शुल्क भरावे लागणार‎आहे.‎

विधी, बीएडसाठी स्वतंत्र हेल्पलाइन

विधी व बीएडसाठी स्वतंत्र‎हेल्पलाइन आहे. पुण्याच्या सहसंचालक कार्यालयातील गणेश वळवी यांना‎नोडल ऑफिसर केले आहे. राज्यातील विधी व बीएड महाविद्यालयांसंदर्भा त‎माहिती हवी असल्यास किंवा तक्रार करायची असल्यास ९०९१९०९१८० या‎क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करण्याची सूचना केली आहे.‎

अंकुश बस‌वण्यासाठी पालकांनीही पुढे यावे‎

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक‎म्हणजेच ईडब्ल्यूएस, इतर मागास‎प्रवर्ग (ओबीसी), सामाजिक व‎शैक्षणिकदृष्ट्या मागास‎(एसईबीसी) व खुल्या प्रवर्गातील‎मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न‎आठ लाखांच्या आत असेल तर‎त्यांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा‎शुल्क आकारू येऊ नये. असा‎शासननिर्णय जारी केला आहे. सर्व‎प्रकारच्या व्यावसायिक शिक्षण‎घेणाऱ्या विद्यार्थिनींना ही शुल्कमाफी‎लागू आहे. पण पालक व‎विद्यार्थिनींना हे माहिती नसल्याने‎कॉलेजकडून सर्रासपणे‎शुल्कवसुली केली जात आहे.‎त्यावर अंकुश बसवण्यासाठी‎हेल्पलाइन आहे.‎

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...