पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न

Date:

पुणे : शहरातील भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. १५ ऑगस्टच्या दिवशीच हा प्रकार घडला. पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.तर आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असून त्याला अटक केली आहे. पीडित मुलीच्या ३० वर्षीय आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील भवानी पेठ परिसरात हे नामांकित हायस्कूल आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी पीडित मुलगी शाळेतील दुसऱ्या मजल्यावर आपली स्कूल बॅग शोधण्यासाठी जात होती. यावेळी आरोपी मुलगा हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ थांबला होता. पीडित मुलगी जवळ येताच आरोपीने हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत घेऊन गेला. यावेळी आरोपीने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मात्र पीडित अल्पवयीन मुलीने आपली सुटका करून घेत पळ काढला.

घरी केल्यानंतर तिने आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपी विरोधात ७४, ७५ (१) (i) पोक्सो ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोहगाव पाणीप्रश्नावर ठोस पावले; आमदार बापूसाहेब पठारे यांची बैठक व पाहणी

पुणे: लोहगाव परिसरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी...

पाषाण तलाव प्रदूषित: महापालिका आयुक्तांची धडक: चार अधिकारी सस्पेंड

पुणे दि. १०.०४.२०२६ : मैलापाणी थेट पाषाण तलावात मिसळून...

आयुक्तसाहेब,’त्या सर्व’ पत्रकारांवर कारवाई कराच..

एकीकडे पोलिसांनीच खोटा पोक्सो दाखल करण्याची धमकी देऊन...