पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी(Pune) पुण्यातील सनी मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र दिले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे,राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा उपस्थित होते.
तसेच ते पुढे म्हणाले की,मी पुणे शहरातील असून आपल्या शहरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे.या विद्यापीठात देशाच्या कानाकोपऱ्यामधून विद्यार्थी शिक्षण घेण्यास येत असतात.मात्र मागील काही घटना लक्षात घेतल्यावर,येत्या काही दिवसात विद्यापीठात शिक्षण घेणार्या विद्यार्थी वर्गासोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून (Pune) घेणार आहे. त्याबाबत विद्यापीठ प्रशासनासोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यात 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा नियुक्ती होऊन काही दिवस होत नाही.तोवर देशातील विशेष पदाधिकाऱ्यांसाठी येत्या 20 ते 22 ऑगस्ट 2024 दरम्यान गोवा राज्यात युवक आणि विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने तीन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचे उदघाटन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे.तर समारोप राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या भाषणांच्या होणार आहे.या शिबिराच्या माध्यमांतून देशभरातील पदाधिकारी एकाच छताखाली येणार असून या माध्यमांतून विचाराची देवाणघेवाण होण्यास मदत होणार आहे.अशी माहिती राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सनी मानकर यांनी (Pune) दिली.