Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

डीएसकेंच्या मालमत्ता विशिष्ट खरेदीदारांसाठीच विक्री होत असल्याचा आरोप, २००० कोटी रेडीरेकनर असलेल्या ११ प्रॉपर्टीची किंमत ८३० कोटी लावली

Date:

पुणे :डीएसकेंच्या मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत मिळू शकतात मात्र मालमत्ता चुकीच्या पद्धतीने विकल्या जात असून ही विक्री प्रक्रिया विशिष्ट खरेदीदारांसाठी राबवली जात असल्याने रद्द करण्यात यावी अशी मागणी आज ठेवीदारांची संघटना असलेल्या चैतन्य सेवाभावी संस्था (असोसिएशन ऑफ डीएसके फ्रॉड व्हिक्टिम्स) ने हिंदू महासंघाच्या सहकार्याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात येत असून मोर्चे,आंदोलने आणि सामुदायिक आत्त्मदहनाद्वारे निर्णायक लढाई लढू,असा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत हिंदू महासंघाच्या वतीने अध्यक्ष आनंद दवे,एड.नीता जोशी,सी ए आदिती जोशी,मनोज तारे,श्वेता कुलकर्णी,विद्या घटवाई,मेघा म्हसवडे,उमेश कुलकर्णी,नितीन जोशी तसेच ठेवीदार संघटनेचे दीपक फडणीस,श्रीकांत अडूळकर,सुधीर गोसावी उपस्थित होते.

डीएसके म्हणजे डी एस कुलकर्णी जेल मध्ये असताना प्रोसिजर फॉलो न करता जो रिसोल्युशन प्लॅन बनवला आहे तो संपूर्णतः बनावट असून तो खरेदी घेणाऱ्या लोकांसाठी बनवण्यात आलेला आहे व त्यामध्ये जमिनीचे बाजार व शासकीय मूल्य ठेवीदारांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ठेवी या बाबींचा विचार करण्यात आलेला नाही,असा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.मालमत्ता विक्री करताना एकाकडून दुसऱ्याकडे नंतर तिसऱ्याकडे विक्री करून थर्ड पार्टी,फोर्थ पार्टी इंटरेस्ट तयार केले जात आहेत. राज्य सरकारचा हस्तक्षेप गरजेचा असून राजकीय नेते लक्ष देत नाहीत ,न्यायालयात ,एनसीएलटी मध्ये संथ गतीने प्रक्रिया चालतात ,न्यायाधीश बदलत राहतात,तारखा पडतात ,यातून ठेवीदार मेटाकुटीला आले आहेत. ३२ हजार पैकी २०० ठेवीदार मृत पावले आहेत ,अशी माहिती देण्यात आली. बँकांनी डीएसके यांच्या मालमत्तेचा लिलाव केला असता तर आता लिलावात जे पैसे मिळत आहेत त्या पेक्षा जास्त मिळाले असते आणि त्यातून ठेवीदारांना परत मिळाले असते ,असेही यावेळी सांगण्यात आले.

पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेले प्रमुख मुद्दे :

१. २००० कोटी रेडी रेकनर असलेल्या म्हणजे बाजारभाव किमान ३००० ते ४००० कोटी असलेल्या ११ प्रॉपर्टी ची किंमत ८३० कोटी कशाच्या आधारे लावली, वॅल्युअर ला हाताशी धरून हा सर्व बनाव करण्यात आला.

२. सदरील रिसोल्युशन प्लॅन सदोष असताना पारित कसा करून घेण्यात आला, यात कोण दोषी आहे याची चौकशी व्हायला पाहिजे.

३. कायदा अश्या पद्धतीने लोकांना लुबाडण्याची संधी आयबीसी किंवा एनसीएलटी च्या माध्यमातून देत नाही, बऱ्याच स्तरावर लोकांना भ्रष्टाचारी मार्गाने आपलंसं करून मोठी अफरातफरी करण्यात अली आहे आणि बत्तीस हजार ठेवी धारकांची फसवणूक करण्यात आली आहे.

४. अफेक्टयेड किंवा इंटरेस्टेड पार्टी म्हणून कोणीही प्रत्यक्ष चालू प्रक्रियेमध्ये आज पर्यंत सहभाग घेतला नाही तो आम्ही सुरवातीला कॅव्हेट व नंतर याचिका कर्ते / प्रतिवादी म्हणून आमचे म्हणेन ऐकून घ्यावे असा विनंती अर्ज / याचिका सर्वोच्च न्यायालयाला करणार आहोत.

५. आमच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आम्ही याचिका / हस्तक्षेप दाखल करणार आहोत. यामध्ये खालील बाबी अधोरेखित करणार आहोत.
अ. डीएसकेंकडे ठेवी ठेवणाऱ्या ठेवींदाराचे पैसे मुख्य कंपनी डीएसकेडीएलकडे जमिनी विकत घेण्यासाठी गेले. हे त्यांच्या बॅलेन्स शीटमध्ये देखील असून याची नोंद पोलिस व ईडीच्या चार्जशीटमध्ये ठळक अक्षरात घेतलेली आहे. याचा अर्थ डीएसकेडीएलच्या प्रॉपर्टीज्‌‍मध्ये ठेवीदारांचाच पैसा आहे.
ब. पण आज ह्या प्रॉपर्टीज्‌‍ मधून ह्या ठेवीदारांना पैसे न देता अक्षरशः कचऱ्याच्या भावात दिल्या जात आहेत, यामागे काय षडयंत्र आहे?
क. दिवाळखोर कायद्याचा वापर करून डीएसकेंच्या ३ ते ४ हजार कोटींच्या मालमत्ता ॲशदान कंपनीला फक्त 826 कोटी रूपयांमध्ये आणि तेही 10 कोटी आता व बाकी नंतर या सवलतीत का देण्यात आल्या? या कायद्याने ठेवीदारांच्या हक्काच्या आणि कष्टाचे पैसे अक्षरशः लुबाडले गेलेले नाहीत का ?
ड. याच ॲशदान कंपनीने अवघ्या 4 महिन्यात डीएसकेडीएल कंपनी साधारण 3 हजार कोटींमध्ये विकायला काढलेली आहे. म्हणजे ॲशदानने 10 कोटी गुंतवून 2200 कोटींचा फायदा मिळवला. हे सगळं ह्या कायद्यामुळे घडतंय की सरकारी यंत्रणा या कटकारस्थानात सामील आहे?

अश्या प्रकारे अशदान कंपनी व सॉलिटेअर ग्रुप यांनी मिळून ठेवीदारांच्या हिताला बाधा आणलेली आहे आणि त्याकरिता सरकारी यंत्रणा जबाबदार आहे, तेंव्हा सर्वांच्या विरोधात हा लढा चालू ठेवण्यात येईल आणि त्यासाठी कायदेशीर लढाई देखील ठेविदार हाती घेत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...