नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून अभिनंदन
पुणे-दक्षिण कोरियामध्ये झालेल्या सतराव्या जागतिक तायक्वांदो कल्चर एक्स्पो २०२४ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोथरुड मधील खेळाडुंनी सुवर्मय कामगिरी केली असून, “योधी तायक्वांदो अकॅडमीच्या सात खेळाडुंनी सुवर्ण, सात रौप्य आणि आठ खेळाडुंनी कांस्य पदकाची कमाई करत या स्पर्धेत भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. त्याबद्दल कोथरुडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
१८ ते २३ जुलै दरम्यान दक्षिण कोरियातील तायक्वांदो वॉन मुजू येथे १७ व्या तायक्वांदो कल्चर एक्स्पो २०२४ आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २६ देशांतून आलेल्या ३५०० खेळाडूंचा यात सहभाग होता. भारतातून ४२ खेळाडुंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी कोथरूड मधील योधी तायक्वांदो अकॅडमीच्या १४ खेळाडुंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत अकादमीचे योगेश ठीक, मनिषा गद्रे, स्मिता सावर्डेकर, आर्यन आकोळकर, दर्श कुलकर्णी, अवनी खाडिलकर, शिवान लाटे, गौतम पुराणिक यांनी सुवर्णपदकाची कमाई केली.
तर राहेश पुजारी, मनिषा गद्रे, योगेश ठीक, स्मिता सावर्डेकर, दर्श कुलकर्णी, श्रीया केळकर, ऋचिर केळकर, अवनी खाडिलकर, गंधार जोगळेकर यांनी रौप्य पदकाची कमाई केली. राजेश पुजारी, श्रीया केळकर, ऋचिर केळकर, किमया वर्तक, गौतम पुराणिक, गंधार जोगळेकर, अनय कलमकर यांनी कांस्य पदकाची कमाई केली.
या सर्व खेळाडुंचा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष सत्कार करुन अभिनंदन केले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी देखील खेळाडुंच्या नेहमीच पाठिशी खंबीरपणे उभे असतात. त्यासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून ही व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे योधी अकादमीच्या खेळाडुंनी मोठे लक्ष्य समोर ठेवून काम करत राहावे, आणि उत्तुंग कामगिरी करून देशाचा नावलौकिक वाढवावा. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सर्व खेळाडूंना दिली.
यावेळी भोसले तायक्वांदो अकादमीचे ग्रॅंड मास्तर चंद्रकांत भोसले, योधी अकादमीचे प्रशिक्षक राजेश पुजारी, सुवर्णा जोगळेकर, मनिषा गद्रे यांच्या सह पालक उपस्थित होते.