तिघेही दहशतवादी किंवा बांगलादेशी असल्याचा निव्वळ संशय,अफवा: प्राथमिक चौकशीत ते बांगलादेशी किंवा दहशत वादी असे काही स्पष्ट झालेले नाही
पुणे- शहरातील कमला नेहरू रुग्णालयात बुधवारी (ता. १४) सकाळी दहशतवादी घुसल्याची अफवा पसरल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत ते मूळचे बिहारचे असून, वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
तत्पूर्वी…..
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कमला नेहरू रुग्णालयात मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास तीन संशयित बांगलादेशी(?) रक्ताच्या नमुन्यांचे अहवाल घेण्यासाठी आले होते .मात्र, सदर संशयित हे पोलिसांच्या रडारवर आल्याने त्यांनी याबाबतची माहिती आणि फोटो रुग्णालयातील डॉक्टर, सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी यांना पाठवले होते. त्यानुसार सतर्कता दाखवत रुग्णालयातील सुरक्षा रक्षक यांनी संशयित तीन बांगलादेशींना एका खोलीत डांबून ठेवत पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयात गोंधळ उडाल्याची परिस्थिती निर्माण झाली .
रुग्णालयातील डॉक्टर प्रशांत बोठे म्हणाले, संबंधित संशयित सोमवारी रुग्णालयात आल्यानंतर शेख नावाच्या एका व्यक्तीने ओपीडी मध्ये अस्थिरोग तपासणी आणि रक्तचाचणी यासाठी केस पेपर काढला होता. सदर विभागात त्यांनी तपासणी केल्यानंतर ते निघून गेले होते. मात्र ,याबाबतची माहिती पोलिसांना माहिती झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयातील विचारपूस केली होती. त्यानुसार रुग्णालयातील स्टाफने संशयतांना पकडून पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
सुरक्षा रक्षक रोहित माने यांनी सांगितले की ,संबंधित तीन संशयित हे सोमवारी रुग्णालयात आले होते. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यावर खडक पोलिस ठाण्याचे पोलिस रुग्णालयात येऊन त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती .यावेळी रुग्णालयात वेगवेगळ्या विभागात संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी सदर संशयीतांचा तपास सुरू केला होता. यादरम्यान संबंधित तिघे पुन्हा रुग्णालयात आल्यास आम्हाला माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले होते .त्यानुसार मंगळवारी सकाळपासूनच पोलिस संशयीतांवर लक्ष ठेवून होते .संबंधित तीन व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांना अहवाल देण्याच्या बहाण्याने एका खोलीत नेण्यात आले .सदर ठिकाणी तिघांना डांबून ठेवत याबाबतची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर थोड्याच वेळात पोलिस दाखल होऊन त्यांनी सदर तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी त्या तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. हे तीन व्यक्ती दहशतवादी किंवा बांगलादेशी असल्याच्या संशय व्यक्त केला जात होता. परंतु हे दहशतवादी किंवा बांगलादेशी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीच आढळून आलेले नाही असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेले तरूण पुण्यात लोहियानगर परिसरात वास्तव्याला आहेत. मूळचे बिहारचे असून त्यांच्याकडे आधारकार्ड मिळून आले आहेत. काही स्थानिकांनी या तरूणांचे फोटो काल समाजमाध्यमांवर बांगलादेशी म्हणून टाकून खोटा मेसेज पसरवला होता. आज हे तरूण कमला नेहरू रूग्णालयात गेले असता समाजमाध्यमांवर फोटो बघितलेल्या सुरक्षारक्षकांनी पोलीस कंट्रोलला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस तिथे पोहोचले . तूर्तास ते दहशतवादी किंवा बांग्लादेशी असल्याच पोलिसांच्या प्राथमिक चौकशीच आढळून आलेल नाही. असे पोलिसांनी सांगितले आहे.काल एक फोटो मोबाइलवर व्हायरल झाला होता. त्यावरून आम्हाला त्यांच्यावर संशय आला. ते काल ब्लड टेस्ट करायला आले होते. तसेच रुग्णालयाबाहेर जाऊन फोटो काढून गेले. आम्हाला हे फारच संशयास्पद वाटलं. आज पुन्हा त्यांना आम्ही पाहिलं. मग त्यांना आम्ही रुग्णालयात स्थानबद्ध करून ठेवले. आम्ही कालपासून त्यांच्यावर नजर ठेवून होतो. आज पण ते ब्लड टेस्ट करायला आले. आम्ही लगेच त्यांना पकडून ठेवले. त्यांच्या बॅगमध्ये बिहारचे आधार कार्ड होते. तातडीने वरिष्ठांना कळवले. तसेच पोलिसांना फोन करून बोलावले. यावेळी आम्ही लोकांना बाहेर काढले. त्यांची वेशभूषा अफगाणी होती. त्यामुळे आम्ही घाबरलो होतो. पण आम्ही नागरिकांची, रुग्णांची सुरक्षा म्हणून तातडीने पाऊल उचलून रुग्णालय बंद केले असल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले.