आपत्तीतून धडा… कालीमठवरून 25 किमीवरील चौमासीपासून सुरू
सोनप्रयाग-गौरीकुंडव्यतिरिक्त केदारनाथ धामसाठी नवीन मार्ग सापडला आहे. तो चौमासी गावातून जातो. तो गुप्तकाशी ते कालीमठ आणि येथून २५ किमी पुढे २१०० मीटर उंचीवर आहे. चौमासी ते केदारनाथ मंदिर हे अंतर १९ किमी आहे, जे सोनप्रयाग ते मंदिरापर्यंतच्या सध्याच्या २१ किमी लांबीच्या मार्गापेक्षा २ किमी कमी आहे. ३१ जुलै रोजी केदारनाथच्या ६ किमी आधी भिंबली येथे ढग फुटल्याने १५ हजार लोक अडकले होते.
७ दिवसांनंतर सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढता आले. या आपत्तीतून धडा घेत रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने गेल्या शुक्रवारी चौमासी येथून मंदिराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यासाठी एक पथक पाठवले होते. हे पथक परत आले असून त्यांनी अद्याप आपला अहवाल सरकारला सादर केलेला नाही, परंतु या पथकाचेे नेतृत्व करणाऱ्या तज्ज्ञाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, चौमासी मार्गावर दरड कोसळण्याचा धोका नाही.कारण येथे डोंगरी नाले नाहीत. या मार्गाचा मोठा भाग खास बुग्याल म्हणजेच डोंगरावरील गवताळ प्रदेशातून जातो. सध्याचा रस्ता १० ते १२ हजार फुटांवर आहे, तर नवीन मार्गाची उंची ६ ते ९ हजार फूट आहे. यावर चढ कमी आहे आणि तो वन्यजीव अभयारण्यातून जातो. येथे कोणत्याही परिस्थितीत हेलिकॉप्टर सेवा सुरळीत राहील. कालीमठ क्षेत्र पंचायत सदस्य विनोद राणा यांच्या मते, २०१३ मध्ये केदारनाथ धाममध्ये आपत्ती आली तेव्हा बचाव पथक चौमासीनेच केदारनाथला पोहोचले होते. येथे ६ फूट रुंद रस्ता आहे. पण, त्याचा विकास करावा लागेल. माउंटन ट्रॅकर्सचे संचालक राहुल मेहता यांच्या म्हणण्यानुसार चौमासीच्या पुढे ५ किमीचा मार्ग कालीगड नदीच्या काठावर आहे. त्यानंतर गवताळ प्रदेश येताे. यानंतर कुठेही नाला किंवा नदी नाही. त्यामुळे या मार्गावर थकवा येणार नाही.