पुणे-पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने व महाराष्ट्र प्रदेश युवक प्रदेशाध्यक्ष मा.कुणाल जी राऊत यांच्या आदेशानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) च्या माध्यमातून PhD अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बंद केल्याच्या निषेधार्थ आज जोरदार आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेस तर्फे बार्टी कार्यालयाला टाळे बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट्टी झाली.युवक काँग्रेस जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवणार असे युवक काँग्रेसने जाहीर केले आहे
भारतीय युवक काँग्रेसचे समन्वयक सुझान मीना,पुणे शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ अमराळे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, प्रदेश सचिव अमोल दौंडकर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश टापरे, मतीन शेख, जय ठोंबरे, अक्षय बहिरट, विनायक रोंदळे, प्रणव खरात व पुणे शहर युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे च्या माध्यमातून पीएचडी अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आधिछात्रवृत्ती देण्यात येते. पण २०२२मधील ७६३ विद्यार्थ्यांना आद्यपर्यंत कुठल्याही प्रकारची आधिछात्रवृत्ती देण्यात आली नाही.तसेच २५ जुलै२०२४ रोजी शासनाने निर्णय घेऊन ५०टक्के दराने आधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. बार्टीच्या विद्यार्थ्यांने या निर्णयाविरोधात ५ ऑगस्ट पासून आमरण उपोषणास बसले असून या उपोषणाची मुख्य मागणी नोंदणी दिनांकापासून १००टक्के आधिछात्रवृत्ती देण्यात यावी ही आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवक काँग्रेसचे बार्टी ताळेबंद आंदोलन
Date:

