नागपूर:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी रात्री नागपुरात बैठक झाली. गेल्या ५ जूनपासून संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि फडणवीसांतील ही चौथी बैठक आहे. नागपूरच्या बीआरए मुंडले शाळेत झालेल्या या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर बोलणी झाली याबाबत संघ किंवा फडणवीस यांच्याकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेत संघाची मदत हवी यासाठी वारंवार आळवणी केली जात आहे. संघाकडूनही कानपिचक्या देत लोकांत मिसळून काम करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश संपादित करता आलेले नाही. यूपी, महाराष्ट्रात पक्षाला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. आता महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यात लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्याचे प्रयत्न भाजप आणि संघाच्या पातळीवर प्रयत्न होत आहेत. त्यानुसार फडणवीसांनी जूनपासून भेटीचे सत्र सुरू केले असे दिसत आहे.
फडणवीसांच्या राजीनाम्याचा विषय मागे पडला
लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांनी ५ जून रोजी राजीनामा देण्याची इच्छा जाहीर केली. त्यानंतर ते दिल्लीला जाण्यापूर्वी ६ जून रोजी त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी सहसरकार्यवाह अतुल लिमयेंसोबत त्यांची बैठक झाली. त्यानंतर फडणवीसांचा दिल्ली दौरा तर झाला. परंतु, त्यांच्या राजीनाम्याचा विषय मागे पडला. या भेटीनंतर २३ जुलै रोजी मुंबईतील लोअर परळ, प्रभादेवी परिसरातील यशवंत भवन या संघाच्या कार्यालयात बैठक झाली. त्यास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते.
फडणवीस -RSS यांची चौथ्यांदा बैठक:विधानसभे साठी ‘संघम शरणम’ची मालिका
Date:

