पुणे,दि.१०: कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा पुरवठा करण्यात येणार असून याकरीता महाडीबीटी संकेतस्थळावर १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत.
राज्य पुरस्कृत एकात्मिक कापुस सोयाबिन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पंपाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
या संकेतस्थळावर अर्ज करावेत. पुणे जिल्ह्यासाठी ६६० पंपांचा लक्ष्यांक निर्धारित करण्यात आला आहे. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जातून लाभार्थ्यांची निवड ऑनलाईन पध्दतीनेच करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.