पुणे:
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त भाजपा महिला मोर्चा पुणे शहरातर्फे कोथरुड मध्ये हातमाग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा वस्त्रोद्योग मंत्री यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. आपल्या देशातील कुशल कारागीर तथा विविध संस्थांद्वारे हातमागावर निर्मित कपडे, चादर, मॅटस् तसेच विविध हस्तकलेच्या वस्तु जसे राख्या, ज्वेलरी, धूप, अत्तर, अगरबत्ती आदी उत्पादनांचा यात समावेश करण्यात आला होता.
गरजू व होतकरु कारागीरांना व या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या उत्पन्नात भर पडावी तसेच ग्राहकांपर्यंत त्यांना थेट पोचता यावे आणि नागरिकांना देखील या उत्पादनांची माहीती व्हावी हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता. कोथरुडकर नागरिकांनी देखील या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्वांचा उत्साह द्विगूणीत केला.
भाजपा महिला मोर्चा, पुणे शहर अध्यक्षा सौ. हर्षदा फरांदे यांच्या संयोजनातून महिला मोर्चा टिम तर्फे हे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते.

