जिल्हास्तरीय आंतरशालेय नृत्य स्पर्धेत सतरा शाळांचा सहभाग
पिंपरी, पुणे (दि.६ ऑगस्ट २०२४) ‘डान्सथॉन’ जिल्हास्तरीय आंतरशालेय नृत्य स्पर्धेचे दुसरे सत्र एस. बी. पाटील पब्लिक स्कूल, रावेत येथे नुकतेच आयोजित केली होती. या स्पर्धेत सिटी प्राईड स्कूलने प्रथम तर एस. बी. पाटील स्कूलने व्दितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत एकूण सतरा शाळांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी २७ नृत्याविष्कारांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. दोन गटात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नृत्य सादरीकरणासाठी तीन विषय देण्यात आले होते.
पहिला गट – इयत्ता सहावी ते आठवी विषय – नाते – मैत्री आणि कुटुंब; कोणतेही शाश्वत ध्येय; इंडो वेस्टर्न (जुगलबंदी) सविस्तर निकाल खालीलप्रमाणे – गट १ मधील विजेते – प्रथम क्रमांक – सिटी प्राईड स्कूल निगडी (एसटीएस), व्दितीय – एस. बी. पाटील पब्लिक स्कूल रावेत (द युनिटी), तृतीय – बीकन स्कूल (भारतीय रॉकस्टार्स), उत्तेजनार्थ – होली एंजल्स स्कूल (एसडीए), एमआयएस इंटरनॅशनल स्कूल (प्रतिबिंब);
दुसरा गट – इयत्ता नववी ते बारावी – विषय – पौराणिक व्यक्तीमत्व, तंत्रज्ञानाची भरभराट, कोणताही सामाजिक संदेश. विजेते – प्रथम क्रमांक – एमआयएस इंटरनॅशनल स्कूल (हृदयंगम); व्दितीय – एस. बी. पाटील पब्लिक स्कूल रावेत (राणी); तृतीय – बीकन स्कूल (द लीजेंड बीकॉनिटीज); एल्प्रो स्कूल (द लिजेंडरी फिगर्स); उत्तेजनार्थ – बड्स स्कूल (डान्सिंग फीट डान्स क्रू); अकॅडमिक स्कूल (एक्रो एंजल्स)
स्पर्धेचे सह प्रायोजक सायकोमेट्रिक चाचणी आणि समुपदेशन या क्षेत्रात अग्रेसर व्हीओसा टीम होती.
प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, शाळेतील नृत्य शिक्षक वर्षा कुलकर्णी व अजय चावरिया, चित्रकला शिक्षक क्रांती कुलकर्णी आणि योगेश देवळे, दर्शना कामत, प्रशासकीय प्रमुख मनीष ढेकळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
नृत्य स्पर्धेचे परिक्षक म्हणून हनीश शहा, अमोल काळुंके, अक्षया बायस यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन अथीरा नायर, सुप्रिया नितीन यांनी केले.