5 वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला आहे..सुपारी पक्ष-आदित्य ठाकरे यांनी काका राज ठाकरे यांना लगावला टोला

Date:

मुंबई- शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरेंबाबत त्यांना विचारणा केली असता, आदित्य ठाकरे म्हणाले की, पाच वर्षानंतर त्यांचा पक्ष झोपेतून उठला आहे, त्यानंतर आता महाराष्ट्रात दौरे चालतात. सुपारी पक्ष… ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू, असे म्हणत आदित्य यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यावरुन मनसेला लक्ष्य केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात झाली असून राज ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यातूनच आपले विधानसभेचे दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे, मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काका राज यांच्या दौऱ्यावरुन निशाणा साधला.
कोरोना काळात असेल किंवा मुंबई चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होतो का? दुपारी पक्ष तिथेच राहील, वरळीत माझ्या विरोधात मला वाटलं बायडन लढत आहेत, असा टोलाही आदित्य यांनी मनसेला लगावला. दरम्यान, यापूर्वीही आदित्य ठाकरेंनी बिनशर्ट म्हणत मनसेवर निशाणा साधला होता. तर, वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार देण्यात येणार असल्याची चर्चा असते, त्यावरूनही मनसेला लक्ष्य केलं होतं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यातील विद्यार्थिनीच्या आत्महत्याप्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीरपणे दखल

कुटुंबाशी फोनवर संवाद साधत दिला धीर पुणे.दि.१३: पुण्यातील बोटॅनिकल सर्व्हे...

इराण भारतीय जहाजांना होर्मुझ पार करण्यास मदत करणार:अमेरिकेला म्हटले- होर्मुझवर हल्ला केला तर आखातातील कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही

इराणवर अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी सुरू-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ

पुणे, दि.१३: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंद...