धाराशिव-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी सोलापुरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते धाराशिव जिल्ह्यात आले. राज ठाकरे धाराशिवमधील पुष्पकपार्क या हॉटेलमध्ये मुक्कामाला आले आहेत. मराठा समाजाचे कार्यकर्ते अचानकपणे हॉटेलमध्ये शिरले आहेत.ठाकरेंनी भेट नाकारल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले असून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे, यावर राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय, यासंदर्भात मराठा आंदोलक राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले होते. परंतु भेट नाकारल्याने अखेर आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले
Date:

