पुणे- वरसगाव, पानशेत, टेमघर येथून खडकवासल्यात पाणी येते आणि तिथून ते पुणे शहराला आणि शेतीला सोडले जाते .गेल्यावर्षी आजच्या दिवशी या चारही धरणात मिळून एकूण पाणी साठा होता 25.09 TMC म्हणजे 86.09% आता आज मितीला या चारही धरणात मिळून एकूण 89.45% म्हणजे 26.07 TMC एवढा पाणी साठा आहे . म्हणजे गेल्या वर्षापेक्षा कितीतरी जास्त पाउस झाल्याने १ टीएमसी जादा पाणी आज मितीला तरी राखून ठेवता आले आहे .
पुण्याची लोकसंख्या आणि आकारमान या दोन्ही गोष्टी वेगाने वाढत आल्या .पण पुण्याची धरणे आणि रेल्वे स्टेशन यांचा विस्तार हव्या तेवढ्या प्रमाणात होऊ शकलेला नाही हे वास्तव आहे. विमानतळांचा विस्तार होतोय . पण पिण्यासाठी शेतीसाठी पाण्याच्या साठवणूक प्रकल्पांना द्यायला पाहिजे तेवढे महत्व आजवर दिले जात नसल्याचे दिसले आहे प्रत्येक वर्षी १५ जुलाई पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा या धरणात असतो, २ वर्षे पुरेल एवढा पाणी साठा ठेवू शकू अशी धरणे,प्रकल्प नाहीत .
दरम्यान आज संध्याकाळी ५ वाजता 1)खडकवासला -56.82% 2)पानशेत -91.01% 3)वरसगाव –90.12% 4)टेमघर – 100% एवढा पाणी साठा होता.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 21175 क्युसेक्स विसर्ग कमी करून संध्याकाळी 6:00 वा. 9416क्यूसेक्स करण्यात आला आहे.

