तज्ञांकडून ‘वास्तववादी टिका’ सहन न करण्याच्या मोदी सरकारच्या अहंकारी वृत्तीचे दर्शन.
ईन्फोसिस’ची बदनामी देशास परवडणारी नाही.
⁃ काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची प्रखर टिका
पुणे दि ५ ॲागस्ट –
एकीकडे पंतप्रधान मोदी स्वतःच् स्वतःची पाठ थोपटून, कथित विकासाचे ओढून ताणून श्रेय घेण्याच्या नादात असंबध्द वल्गना करत आहेत, ही देशा विषयी चिंतेची बाब आहे. चिन व इतर प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत पंतप्रधान मोदी देशाच्या विकासदरावर बोलतांना भारत जागतिक ऊत्पादक केंद्र बनण्याच्या अवास्तव धोषणा करत असतांनाच, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या श्री नारायण मुर्तीं यांनी ‘भारताच्या क्षमते बाबत’ वास्तववादी आरसा दाखवण्याचे काम केले व भारताची उत्पादन क्षमता वाढीवर, वास्तववादी भाष्य करून, मोदींच्या अवास्तव वक्तव्यांवर पाणी सांडले व एक प्रकारे असहमती व्यक्त केली. याचाच् परीणाम म्हणुन भारतीय आयटी क्षेत्राचे जनक समजले जाणारे, पदमश्री / पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवांन्कीत असलेल्या श्री नारायण मुर्ती यांच्या इन्फोसीस’ला मोदी सरकारने केवळ आकसाने, धाकदपटशा वृत्तीने व कररुपी दहशतवादी वृत्तीने, ‘डायरेक्टर जनरल ॲाफ जीएसटी इंटेलीजन्स जनरल’ डीजीजीआय तर्फे ₹ ३२,४०० कोटी जीएसटी डुबवल्याची (चोरी केल्याची..?) नोटीस दिली व एक प्रकारे देशासाठी भुषण ठरलेल्या ईन्फोसीस’ची बदनामी केली, या विषयी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी तिव्र खेद व्यक्त करुन प्रखर टिका केली.
ते पुढे म्हणाले की, इन्फोसिस कं भारताची आत्म-निर्भरता व्यक्त करीत, जगात ‘भारताचे प्रतिनिधीत्व’ करत आहे.
देशाचे भाषणजीवी व श्रेयजीवी पंतप्रधान अवास्तविक पणे देशाच्या क्षमते विषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर भाष्य करत असतील तर देशाचे हसे होऊ नये, देशाची भुमिका आंतराष्ट्रीय स्तरावर वास्तववादी असावी, हीच भावना कोणाही देशप्रेमी नागरीकाची असणार यामध्ये दुमत असायचे कारण नाही.
मात्र नारायण मुर्ती यांनी चिन व इतर प्रगत राष्ट्रांशी तुलना करत असतांना ‘देशाच्या वास्तवतेवर बोलले, प्रकाश टाकुन वास्तवते कडे लक्ष वेघले व प्राप्त परिस्थिती विषयी आरसा दाखवल्याचे काम केले’ हा काही देशद्रोह केलेला नाही.
मात्र विकासा बाबत स्वप्नरंजित व आत्म केंद्रीत मोदी सरकारने ईन्फोसिस ला कालबाह्य व अतार्किक ‘दंड आकारणीची’ नोटीस देऊन, स्वतःचे हसे करून घेतले व बौध्दीक दिवाळखोरीचे व संकुचित वृत्तीचे प्रदर्शन केले असल्याची प्रखर टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
इन्फोसीस’ला सुडबुध्दीने ‘जीएसटी चोरल्याची’ नोटीस..!
Date:

