मुंबई: बँक ऑफ इंडियाने त्यांचे वित्तीय निकाल जाहीर केले असून, वित्त वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 10% वाढ झाली आहे. वित्त वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत 1,703 कोटी रुपये निव्वळ नफा राहिला असून, वित्त वर्ष 24 च्या पहिल्या तिमाहीमध्ये तो 1,551 कोटी रुपये होता. ऑपरेटिंग प्रॉफिट वित्त वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीसाठी रु.3,677 कोटी होता, तर वित्त वर्ष 24 च्या पहिल्या तिमाहीमध्ये रु.3,752 कोटी राहिला होता.
मालमत्तेच्या गुणवत्तेच्या आघाडीवर, निव्वळ NPA जून 23 मधील रु. 8,118 कोटींवरून 30% वार्षिक घट होऊन जून 24 मध्ये रु. 5,702 कोटी झाला आहे. ग्लोबल बिझनेस 12.34% वार्षिक वाढून जून 23 मध्ये रु. 12,14,808 कोटी असलेला बिझनेस जून 24 मध्ये रु. 13,64,660 कोटी झाला आहे.
निव्वळ व्याज उत्पन्न (NII) वार्षिक 6% ने वाढले आणि वित्त वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीसाठी 6,275 कोटी रुपये राहिले. वित्त वर्ष 24 च्या पहिल्या तिमाहीत ते 5,915 कोटी रुपये होते. बँकेचे एकूण भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (CRAR) 58 bps ने सुधारले आणि 30.06.23 रोजी 15.60% विरुद्ध 30.06.24 रोजी 16.18% झाले. रॅम ॲडव्हान्स वार्षिक आधारावर 18.78% ने वाढून 2,84,646 कोटी रुपये झाले असून, जून 24 मध्ये ॲडव्हान्सच्या ते 56.01% झाले आहे.
जून 24 मध्ये रिटेल क्रेडिट 20.46% वार्षिक वाढून 1,15,183 कोटी रुपये झाले. कृषी कर्जामध्ये वार्षिक 22.18% वाढ झाली आहे. MSME क्रेडिटमध्ये 13.06% वार्षिक वाढ झाली. देशांतर्गत CASA जून 23 मधील 2,60,615 कोटी रुपयांवरून वार्षिक 5.51% वाढून जून 24 मध्ये 2,74,973 कोटी रुपयांवर गेला आणि CASA प्रमाण 42.68% राहिला आहे.
बँकेने वित्त वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 3.78 लाख नवीन प्रधानमंत्री जन धन योजना खाती उघडली आहेत.
30 जून’24 पर्यंत बँकेच्या देशांतर्गत शाखांची संख्या 5,155 आहे.

