पुणे-कात्रज येथील स्व.अंबरचंदजी मुनाेत शिक्षण संस्था संचालित, मुनाेत प्राथमिक विद्यालय व स्व.साै झुंबरबाई मुनाेत माध्यमिक विद्यालय या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशाेक मुनाेत, सचिव निखील मुनाेत, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षदा मुनाेत-गुगळे, माध्यमिक शाळा मुख्याध्यापिका सुरेखा सुतार व प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका उल्का नवगिरे यांच्या विरुध्द भारती विद्यापीठ पाेलfस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील १० ते १२ वर्षापासून या सर्वांनी शारिरिक, मानसिक व आर्थिक पिळवणूक केल्याचा आराेप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
याप्रकरणी ज्ञानाेबा साधु सराटे (वय-३५,रा.कात्रज,पुणे) यांनी आराेपी विराेधात पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पाेलिसांनी आराेपींवर भादंवि कलम ३८४, ३४ नुसार गुन्हा नाेंद केला आहे. तक्रारदार व त्यांच्या साेबतच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आराेपींनी बाेलावून शासकीय अनुदानाची फाईल शिक्षण विभागाकडे पाठवायची असेल तर प्रत्येकी 5 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तसेच त्यानंतर पुढे निवृत्त हाेईपर्यंत दरमहा पगाराच्या 10 टक्के रक्कम ही संस्थेस द्यावी लागेल अशी मागणी केली. तक्रारदार तसेच त्यांसे सहकारी शिक्षकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये राेख स्वरुपात व ऑनलाईन पध्दतीने असे एकूण २५ हजार रुपये आराेपींनी स्विकारले. तसेच दरमहा पगाराच्या दहा टक्के रकमेची वेळाेवेळी मागणी करुन ती शिक्षकांनी देण्यास नकार दिल्याने, त्यांना नाेकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देवून त्या सर्वांचा आर्थिक, मानसिक,शारिरिक छळ करण्यात आला.
याबाबत शिक्षकांनी वेळाेवेळी शिक्षण विभागाकडे देखील तक्रार केली हाेती. शिक्षण विभाग मार्फत संबंधित संस्था व शाळा याविषयी सखाेल चाैकशी हाेऊनही शिक्षण विभागाने याबाबत गंभीर्याने दखल घेतली नसल्याचे समाेर आले आहे. याप्रकरणी पुढील तपास भारती विद्यापीठ पाेलिस करत आहेत.

