म्हणाले,लोकांची हि छळवणूक..निव्वळ सरकारी तिजोरी भरण्यासाठी
पुणे-पुणे शहरात वाहनचालकांवर सीसीटिव्हीच्या माध्यमातून ठोठावण्यात येत असलेला जाचक दंड आणि खटले तातडीने मागे घ्या, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
शहरात गेल्या काही दिवसापासून सीसीटिव्हीच्या माध्यमातून ऑनलाईन दंड वाहनचालकांना लावला जात आहे. हा दंड नेमका कशासाठी लावला, याचे कारण वाहनचालकांना कुठल्याही पद्धतीने सांगितले जात नाही. ‘तातडीने दंड भरा’ असे एसएमएस मात्र वाहनचालकांना सातत्याने येत आहेत. नोटीसाही पाठवल्या जात आहेत. याकडे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
जनता महागाईने त्रस्त आहे. पेट्रोल डिझेल गॅस याच्या भाववाढीने लोक कंटाळले आहेत. अशा स्थितीत नाहक दंड वाहन चालकांकडून आकारला जात आहे. पोलिसांकडून वाहनधारकांची वाहने अडून ‘प्रलंबित दंड भरा’ अशी सक्ती होत आहे. आर्थिक परिस्थिती नसताना अनेक वाहनचालकांना हा दंड भरावा लागत आहे. यामुळे पुणेकर नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. म्हणून हा दंड आणि खटले रद्द केले जावेत, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

