पुण्याजवळ 8-पदरी उन्नत  नाशिक फाटा – खेड कॉरिडॉरसाठी  7,827 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजूर

Date:

केंद्रीय मंत्रिमंडळाने   50,655 कोटी रुपये एकूण भांडवली खर्चाच्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना  दिली मंजुरी, यामुळे लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारेल , वाहतूक कोंडी कमी होईल आणि देशभरातील कनेक्टिव्हिटी वाढेल


पुणे आणि नाशिक दरम्यान 8-पदरी उन्नत उड्डाणपूल कॉरिडॉर खंड लॉजिस्टिक खर्च कमी करेल

नवी दिल्ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक  मंत्रिमंडळ समितीने देशभरात 50,655 कोटी  रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पांच्या विकासाला मंजुरी दिली आहे. . या 8 प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे सुमारे  4.42 कोटी मनुष्यदिवस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.

प्रकल्पांबाबत संक्षिप्त माहिती :

1. 6-पदरी  आग्रा – ग्वाल्हेर राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर:

88-किमीचा  हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर  पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित 6-पदरी  कॉरिडॉर म्हणून विकसित केला जाईल आणि यासाठी  4,613 कोटी रुपये  एकूण भांडवली खर्च येईल.

2.  4-पदरी  खरगपूर – मोरेग्राम राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर:

खरगपूर आणि मोरेग्राम दरम्यान 231-किमीचा  4-पदरी प्रवेश-नियंत्रित हाय-स्पीड कॉरिडॉर हा हायब्रीड ॲन्युइटी मोड वर  विकसित केला जाईल. याचा एकूण भांडवली खर्च 10,247 कोटी रुपये आहे.

3. 6-पदरी थरड – दिसा  – मेहसाणा – अहमदाबाद राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर:

214-किमीचा  6-पदरी  हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा – वापरा  – हस्तांतरित करा तत्वावर 10,534 कोटी रुपये  एकूण  भांडवली खर्चासह विकसित केला जाईल. 10,534 कोटी.

4. 4-पदरी  अयोध्या रिंग रोड:

68-किमीचा  4-पदरी  प्रवेश-नियंत्रित अयोध्या रिंगरोड हा हायब्रीड ॲन्युइटी मोड मध्ये 3,935 कोटी रुपये एकूण  भांडवली खर्चासह विकसित केला जाईल. .

5. रायपूर-रांची राष्ट्रीय  हायस्पीड कॉरिडॉरचा पथलगाव आणि गुमला दरम्यान 4-पदरी खंड :

रायपूर – रांची कॉरिडॉरचा 137-किमीचा  4-पदरी  प्रवेश-नियंत्रित पथलगाव – गुमला खंड  हायब्रीड ॲन्युइटी मोड मध्ये विकसित केला जाईल. संपूर्ण कॉरिडॉर पूर्ण करण्यासाठी 4,473 कोटी रुपये एकूण भांडवली खर्च येईल.

6. 6-पदरी कानपूर रिंग रोड:

कानपूर रिंगरोडचा 47-किमीचा 6-पदरी प्रवेश-नियंत्रितखंड अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम पद्धतीने  एकूण. 3,298 कोटी रुपये भांडवली खर्चासह विकसित केला जाईल.

7. 4- पदरी उत्तर गुवाहाटी बायपास आणि विद्यमान गुवाहाटी बायपासचे रुंदीकरण/सुधारणा:

121-किमीचा  गुवाहाटी रिंगरोड बांधा, वापरा, टोल  (बीओटी) मोडमध्ये विकसित केला जाईल. यासाठी एकूण भांडवली खर्च 5,729 कोटी रुपये येईल.

8. पुण्याजवळ 8-पदरी उन्नत  नाशिक फाटा – खेड कॉरिडॉर:

पुण्याजवळ नाशिक फाटा ते  खेड दरम्यान  30-किमीचा  8-पदरी उन्नत राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा-वापरा -हस्तांतरित करा तत्वावर विकसित केला जाईल. यासाठी 7,827 कोटी रुपये भांडवली खर्च येईल. उन्नत कॉरिडॉर पुणे आणि नाशिक दरम्यानच्या NH-60 वरील चाकण, भोसरी इत्यादी औद्योगिक केंद्रांवरून जाणाऱ्या /येणाऱ्या वाहतुकीसाठी वेगवान हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या कॉरिडॉरमुळे पिंपरी-चिंचवडमधील मोठी वाहतूक कोंडी  कमी होणार आहे.

नाशिक फाटा ते खेड कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंच्या 2 पदरी  सर्व्हिस रोडसह विद्यमान रस्त्याचे 4/6  पदरी रस्त्यात रूपांतर करण्यासह सिंगल पिलरवर  टियर  – 1 वर 8 पदरी उन्नत उड्डाणपूल महाराष्ट्र राज्यातील NH-60 च्या खंड  (Pkg-1: from km 12.190 to km 28.925 & Pkg-2: from km 28.925 to km 42.113) वर बांधण्यात येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

10 ग्रॅम सोने 3 हजार रुपयांनी स्वस्त,पावणे दिन लाखावर पोहोचलेले सोने आज दीड लाखावर

नुकतेच काही दिवसा अगोदर पावणे दिन लाखावर पोहोचलेले...

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...