रात्रभरात एकूण 478 खड्डे बुजवले
पुणे- पुण्याचे महापौर म्हणून अडीच वर्षाहून अधिक काल काम पाहिलेले आणि नंतर आता खासदार आणि केंद्रीय मंत्री पदावर पोहोचलेल्या मुरलीधर मोहोळांनी खड्ड्यांनी पुण्याची इभ्रत जाऊ नये म्हणून महापलिकेत जाऊन आपल्या जुन्या सहकारी अधिकाऱ्यांच्या सह सर्वच अधिकाऱ्यांना खड्डे बुजविण्यासाठी खरे तर तंबी नाही दिली पण साद घातली , दिली हाक … आणि आता त्यांच्या सादेला महापालिका अधिकाऱ्यांनी प्रतिसादही दिला आहे . म्हटले आहे मोहोळांची हाक तर हम सब है साथ साथ …
नेमके काय ?
केंद्रीय मंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी काल महापालिकेत जाऊन बैठक घेतली आणि रस्त्यांवरील वाढते खड्डे शहराची इभ्रत घालू पाहत आहेत, नागरिकांच्या हाल अपेस्त वाढवीत आहे म्हणून तातडीने हे खड्डे बुजविण्यासाठी आपल्या नेहमीच्या प्रेमळ स्टाईल मध्ये अधिकाऱ्यांना साद घातली … अन या सादेला प्रतिसाद देखील मिळाला . त्यांनी दिलेल्या निर्देशा नुसार पुणे शहरांमधील विविध रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याची मोहीम काल रात्रीपासून तीव्र करण्यात आली आहे. पथ विभागाचे मुख्य तरुण स्मार्ट अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्या नेतृत्वाखाली पथ विभागातील सर्व अभियंत्यांनी काल रात्रभर काँक्रीटच्या माध्यमातून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. पोलीस खात्याने दिलेल्या यादीतील मुख्य रस्ते व त्यावरील असलेले चौक येथे खड्डे बुजवण्याची कामे करण्यात आली. पोलीस खात्यातील संबंधित अधिकारी यांनी देखील या कामांमध्ये सहकार्य केले. काल रात्रभरात एकूण 478 खड्डे बुजवण्यात आले तर सुमारे 22 ठिकाणी पॅचवर्कची कामे हाती घेण्यात आली. रात्री दहा वाजता सुरू झालेली ही मोहीम सकाळी सहा वाजेपर्यंत हाती घेण्यात आली. महापालिका आयुक्त यांनी मार्गदर्शन केल्यानंतर या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. आज रात्री देखील अशी मोहीम पुन्हा हाती घेण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त संख्येने खड्डे बुजवण्याचे काम करण्यात येणार आहे.मोहोळ यांच्या हाकेला जर असाच प्रतिसाद कायम राहिला तर … शहर खरोखर स्मार्ट व्हायला वेळ लागणार नाही असे काहींचे म्हणणे आहे.

