पुणे-कालपासून दिलेला रेड अलर्ट आणि खडकवासल्यातून ३५ हजार क्युसेक विसर्ग आज सकाळी ११ वाजता होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आपत्ती आणि व्यवस्थापन यंत्रांना सज्ज झालेल्या असाव्यात असे चित्र आहे .रेड अलर्ट आणि विसर्गाच्या पार्श्वभूमीवर… – सिंहगड रस्ता येथे एकता नगरी याठिकाणी सनसिटी अग्निशमन केंद्र आणि पीएमआरडीए अग्निशमन वाहने तीन बोटींसह कार्यरत – नवले अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन निंबोज नगर येथे कार्यर – जनता अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन दत्तवाडी घाट येथे कार्यरत – कसबा अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन नदीपत्रातील भिडे पूल येथे कार्यरत – एरंडवणा अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन नदीपात्र पुलाचीवाडी येथे कार्यरत – येरवडा अग्निशमन केंद्र अग्निशमन वाहन व पीएमआरडीए येथील रेस्क्यू व्हॅन विश्रांतवाडी याठिकाणी कार्यरत – नायडू अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन ताडीवाला रोड याठिकाणी कार्यरत – सद्यस्थितीत सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात.
35 हजार क्युसेक विसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे सज्ज
Date:

