पुणे -येथे आलेल्या प्रलयंकारी पुरावेळी विजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडलेल्या अभिषेक घाणेकर आणि आकाश माने या तरुणांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी पाण्यातील पुरात या तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बाब त्यांनी मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांना राज्य आपत्ती निवारण निधीतून ५ लाख रुपयांची मदत झाली होती. मात्र या दोन्ही तरुणांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ही मदत त्यांना पुरेशी नसल्याने विशेष बाब म्हणून त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी १० लाखांची मदत करण्यात आली. सदरची मदत मनसे शिष्टमंडळातील आबा शेडगे आणि रणजित शितोळे यांना प्रतिनिधिक स्वरूपात सुपूर्द करण्यात आली आहे. ते या तरुणांच्या कुटूंबियांपर्यंत ती मदत पोहचवणार आहेत.असे CMO मधून सांगण्यात आले आहे.
पुलाच्या वाडीतील ‘त्या ‘ २ मृतांच्या नातलगांना १० लाखाची मदत
Date:

